पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.] शेतीविषयक तयारी ११३ ___ हिंदुस्थानांतील जमिनींत कमी पीक येण्याची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी काही अनिवार्य असून कांहींचा बंदोबस्त करता येण्यासारखा आहे. अगदी मोठ्या महत्त्वाचें व अनिवार्य कारण म्हणजे पावसाची अनिश्चितता होय. पाऊस बंगाल, ब्रह्मदेश व कोंकण किंवा पूर्व पश्चिम घाट याखेरीज सर्वत्र अव्यवस्थितपणे पडतो. यासाठी पिकांस पाण्याचा पुरवठा हुकमी करता येत नाही, कालव्याखाली भिजणारे हिंदुस्थानचे क्षेत्र अत्यंत अल्लं आहे. याशिवाय पाण्याची सोय म्हणजे गांवची तळी व विहिरी होत. दुसरे कारण म्हणजे शेती करण्याची फार प्राचीन काळापासून चालत आलेली ठरलेली पद्धत होय. या पद्धतींत कोणत्या सुधारणा कशा करता येतील याचा कोणी विचार केलेला नाही व कांही विचार झाला असल्यास तो अमलांत नाही. अगदी पृथ्वीच्या प्रारंभी कश्यप संहितेत में नांगर वगैरेचे माप व वर्णन आहे तेच आज सुमारे दहा हजार वर्षे प्रचारांत आहे. लोक अत्यंत साधेभोळे असून ते आपली पूर्वपरंपरा सोडावयास तयार नाहीत. तथापि उत्तम म्हणून जे काही कोठेहि सांपडेल ते उचलून आत्मसात् करण्यांत हिंदु लोकांचा हातखंडा आहे. याप्रमाणे लोक सुधारणा उचलतील, पण त्या आत्मसात् झाल्या पाहिजेत ही त्यांची अटहि बरोबर आहे. नांगर वगैरे हत्यारे करण्याचे लोखंड परकी, ती हत्यारे बनविणारे व विकणारे परकी, त्यांचा उपयोग सांगणारे परकी, त्यांची दुरुस्ती करणारे. देखील परकी. अशा स्थितीत हिंदी लोक या सुधारलेल्या आयुधे वगैरेंचा उपयोग करण्यास निरुत्सुक असावे हे साहजिक आहे, हिंदुस्थानातील शेतकऱ्यांची मनोरचना जगांतील इतर देशांतील शेतकऱ्यांच्या मनोरचनेपेक्षां भिन्न नाही. सुधारणा, नव्या सुधारणा, अपरिचित सुधारणा स्वीकारण्याबद्दल साशंक असणे हा मनुष्यस्वभावच आहे. परमेश्वराने ही साशंक वृत्ती माणसाच्या हितासाठीच त्याच्या हृदयांत ठेवली आहे. आपला जीव वाचविण्यासाठी ही साशंक वृत्ति जरूर असते. अपरिचित मनुष्य आपल्याला चोरील, अपरिचित प्राणी आपल्याला खाईल, अपरिचित वस्तु आपणांस अपाय करील, अपरिचित पद्धत आपणांस धोक्यांत घालील या शंका जन्मतःच प्राण्यांच्या हृदयांत आपल्या संरक्षणाची साधने म्हणून ठेवलेल्या असतात. आपण शेतकऱ्यांच्या, हिंदी भा...हिं...स्व...८