पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण सातव कट शेतीविषयक तयारी देशी संस्थानांसुद्धां सर्व हिंदुस्थानाचा शेतीचा विस्तार घेतला तर तो चीन व अमेरिकेतील संयुक्त संस्थाने सोडून पृथ्वीवरील कोणत्याहि देशाच्या शेतीच्या विस्तारापेक्षा जास्त आहे. या शेतीचे उत्पन्न लढाईपूर्वीच्या भावाने ६,००,००,००,००० रुपये होते, हे उत्पन्न शेतक-यांच्या लोकसंख्येवर वांटले तर दरमाणशीं तीस रुपये व सर्व लोकसंख्येवर वांटले तर दरमाणशी वीस रुपये पडते. या बाबींत हिंदुस्थान व जपान यांची तुलना केली तर असे दिसते की जपान देश आपल्या स्वतःच्या उत्पन्नावर आपला निर्वाह करतो म्हणून एका जपानी माणसाला एकतृतीयांश एकर जमिनीचे उत्पन्न पोटभर होते; पण हिंदुस्थानांतील दरमाणशी पांचषष्टांश एकर जमिनीच्या उत्पन्नांत फक्त एकदांच अन्न मिळते. जपानचे दरमाणशी शेतीचे उत्पन्न रुपये दीडशे आहे. जपान व हिंदुस्थान यांच्या उत्पन्नांत इतके अंतर पडण्याचे कारण काय असा साहजीकच प्रश्न उत्पन्न होतो व त्याचे उत्तर हेच की, जपानांतील साधारण शेती बागाइताप्रमाणे काळजीपूर्वक करण्यांत येते. त्या देशांत खत मूत घालण्याची व्यवस्था फार विचारपूर्वक अमलांत आहे. जपानांत माणसांची लघवी अगदीं व्यर्थ घालवीत नाहीत. दरएक घरांत मोरीऐवजी माती घातलेला कुंडा असतो व या कुंड्यांत सर्व माणसें लघवी करून ती माती शेतांत घालतात. बाजारांत देखील कागदी तंबू असून त्यांत हे लघवीचे कुंडे ठेवलेले असतात. या रीतीने लघवीतील सर्व क्षार मातीत व शेतांत जातात. तसेंच भाताची लावणी. दोन रोपांमधील अंतर काठीने मोजून अगदी सारख्या अंतरावर लावतात. खेडेगांवांत गांवोगांव तरुणांचे संघ असतात. हे संघ पीक जास्त येण्यासाठी दररोज नवीन कांहीं युक्त्या नेहमी शोधून काढीत असतात व अशा मंडळांना सरकारी तज्ञ योग्य ती सल्ला फुकट देत अततात.