पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

थे. शिक्षणविषयक तयारी शिकविण्याच्या पद्धतीत पूर्ण मुभा द्यावी व विद्यार्थ्यांत तो विषय कसा उतरतो यावर बढती वगैरे ठेवावी. शिक्षक एका विषयांत निष्णात व शिकविण्याची हौस असलेला असावा व त्याचा पगार त्याच्या चरितार्थास व त्याच्या दर्जास शोभेसा असावा. जनता व सरकार यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, पद्धतशीर रीतीने काम करून व जरूर तो पैसा सढळ हाताने खर्च करूनच शिक्षणांत सुधारणा होणार आहे. या महत्त्वाच्या कामी चिक्कूपणा बिलकुल उपयोगी नाही. असा सढळ हातानें खर्च करून व अनेक कष्ट सोसून उत्तम शिक्षण दिल्यानेच देशाची उन्नति व कल्याण होणार व याशिवाय या उन्नतीला किंवा कल्याणाला दुसरा मार्ग नाही.