पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

NACULAR arRANSLA SIE UN ACULAR २. रनमयलर भावी हिंदी स्वराज्य टिम का प्रस्तावना खंडा रोपात - आपल्याला स्वराज्य पाहिजे असे आपण सर्व जण म्हणतों. पण ते स्वराज्य म्हणजे काय, त्या स्वराज्यांत कोणती स्थिति असेल व ती स्थिति नीट रहायावला आपणांस काय करावे लागेल याची स्पष्ट कल्पना फारच थोड्यांना असेल. ही स्पष्ट कल्पना लोकांच्या डोळ्यांपुढे ठेवावी म्हणन 'भावी हिंदी स्वराज्य' हे पुस्तक हिंदी जनतेपुढे मांडीत आहो. विषयविवेचनाची सोय व्हावी म्हणून एकापुढे एक अशा कल्पित पायऱ्या पाडून विवेचन केले आहे. पण व्यवहारांत या पायऱ्यांचा अनुक्रम राहील अगर राहिला पाहिजे असे नाही. व्यवहारांत सगळ्या पायऱ्यांवर एकदमच काम चालणार आहे व एका पायरीवरील कामाचा परिणाम इतर सर्व पायऱ्यांवर व इतर पायांवरील कामाचा परिणाम प्रत्येक पायरीवर होणार आहे. हे ठाऊक असून केवळ विवेचनाच्या सोईसाठीं प्रत्येक पायरी स्वतंत्र आहे असे कल्पून विवेचन केले आहे. अशा काल्पनिक स्वतंत्रपणाने काहीहि न बिघडतां एकाच ठिकाणी लक्ष एकाग्र करण्यास सोईचे पडते. एखाद्या लढाईत ज्याप्रमाणे वर्णन करण्याच्या सोईसाठी एका एका वीराची त्या दिवशीची हकीगत स्वतंत्रपणे द्यावी लागते व अशा सर्व वीरांच्या हकीगतींचा समुच्चय म्हणजे त्या दिवशींच्या लढाईची हकीगत होय; त्याचप्रमाणे ही विवेचनाची तव्हा आहे. एका गोष्टीचे वर्णन अगोदर आले म्हणून ती जास्त महत्त्वाची अगर अगोदर घडली व एकीचे वर्णन मागून आले म्हणून ती कमी महत्त्वाची, अगर