पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मावी हिंदी स्वराज्य .. [प्र०६ नाहीत असा अनुभव आहे. व हे एक मोठे देशाचे नुकसान आहे. तात्पर्य, युनिव्हर्सिटी म्हणजे पुढारी, व्यवस्थापक, म्यानेजर, गव्हर्नर, डायरेक्टर, काउन्सिलर वगैरे माणसे तयार करण्याचा कारखाना झाला पाहिजे... युनिटीत शिकवावयाचे विषय म्हणजे वैद्यक, शिल्प, यंत्र, विद्यत्, रसायन, खनिज, शेती. जंगल, नौका, विमान, व्यापार, कारखाने व पेढ्या हे होत. प्रत्येक पदवीधरास या विषयापैकी एकतरी विषय यावयाला हवा. शिवाय भाषा वगैरे विषय व अर्थशास्त्र, समाजशास्त्र व अंकानुमान ही अवश्य पाहिजेत म्हणून वर सांगितलेच आहे. विशेषतः व्यापार, यंत्र व धंदे हे विषय हिंदुस्थानाला अत्यंत अवश्य आहेत. ____ अगदी पहिली गोष्ट म्हणजे भाषांवार युनिव्हर्सिट्या स्थापल्या पाहिजेत व सर्व शिक्षण देशी भाषेतून दिले पाहिजे, सरकारचा हात शिक्षणांत बिल कुल नसावा व केवळ तज्ञ लोकांना पूर्ण मुभा देऊन त्यांच्याकडून हा सर्व कारभार करावा. यासाठी लागणारा पैसा दिवाणांनी कर्ज काढून मिळवावा व पैसा नाही ही रड न सांगतां उत्तम काम करून दाखवावे. या गोष्टीकडे पहिल्याने लक्ष दिले पाहिजे.लोकल बोर्डाचे उत्पन्न दुप्पट करण्याची व्यवस्था झालीच आहे. क मेट्यांनी देखील तसे करावे व हे पैसे शिक्षण मंडळाने खर्च करावे. हे शिक्षण मंडळ सर्व जनतेला जबाबदार व अगदर्दी निवडक माणसांचे पाहिजे. - याशिवाय प्रत्येक प्रांताने आपल्या युनिव्हर्सिटीत ज्याने ज्या कामांत नांव मिळविले त्याला तोच धंदा शिकण्यासाठी परदेशी पाठवावे, या शिक्षणाचा निम्मा खर्च सरकारने द्यावा व निम्मा त्या इसमाने धनिक वगैरेपासून मिळवावा व त्याबद्दल आपल्या आयुष्याच्या विम्याची हमी द्यावी. यासाठी अशा मुलांना जरा खालींच युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाल्यावर कोणती तरी परकी भाषा शिकण्याची सल्ला द्यावी. अशी सल्ला दिलेल्या मंडळीतून जरूर त्यांची त्या धंद्यांतील प्राविण्यानुसार निवड करावी. दुसरी महत्वाची बाब म्हणजे शिक्षक तयार करणे होय. धंदेवाइकांना शिक्षक होण्यासाठी शिष्यवृत्त्या द्याव्या व त्या ठिकाणी कसे शिकवावें हे त्यांस शिकवावें. हल्ली शिक्षक तयार करण्याची पद्धत नीट नाही. शिक्षकाला