पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिक्षणविषयक तयारी मंडळ यांच्या शिफारसीने फुकट घ्यावे. इतरांनी फी दिली पाहिजे. याप्रमाणे दुय्यम शिक्षणांत चार सहा वर्षे घालविल्यावर मुलाला व्यवहार म्हणजे काय हे समजले पाहिजे. नीट विचार करावा, शुद्ध आचरण ठेवावें, काय व कसे पहावे व त्यापासून सिद्धांत कसे काढावे, उद्योग, काटकसर व एकी किंवा जूट यांचे महत्त्व काय, स्वदेश व नागरिक यांचे संबंध काय, इतक्या गोष्टी त्याला समजल्या पाहिजेत. या शिक्षणांत शिल्प, यंत्र, धंदे, शेती, व्यापार, वैद्यक, नकशीकाम, मातीकाम, शिंपीकाम, वीणकाम, चामड्याचे काम, कारखान्यांतील काम, व घरे बांधण्याची माहिती यांपैकी काही तरी एक शिकलेच पाहिजे अशी सक्तिः असावी. धंदे व बौद्धिक शिक्षण ही दोन्ही बरोबरच शिकविली पाहिजेतः किंवा वर्षाकाठी काही दिवस बौद्धिक व काही दिवस धंदेशिक्षण घ्यावें.. या शिक्षणाच्या कामी गांवांतील कागगीर वगैरेंची मदत घ्यावी. दुय्यम शिक्षणानंतर ज्यांना उच्च शिक्षणाकरतां युनिव्हर्सिटीत जाण्याला ऐपत अगर वेळ नाही त्यांना देखील जास्त शिक्षण घेण्याची सोय दरएक जिल्हाचे ठिकाणी थोडी फार व्हावी. अशी व्यवस्था करण्याच्या कामी युनिव्हर्सिटीला मदत करता यावी म्हणून जिल्हा शिक्षणमंडळांत युनिव्हर्सिटीचा एक सभासद घेतला आहे. त्याने याबाबद जरूर ती खटपट व शक्य ती योजना करावी. अशा कामाला धनिक लोकांचे सहाय्य मिळणे अशक्य वाटत नाही. प्रत्येक युनिव्हर्सिटीने नेहमीच्या उच्च शिक्षणाबरोबर अर्थशास्त्र, समाजशास्त्र व अंकानुमानशास्त्र (Statistics) यांचा अभ्यास अवश्य ठेवला पाहिजे. अशा शिक्षणाने प्रत्येक पदवीघर आपआपल्या धंद्यांत प्रमुख भाग घेऊ शकेल. निव्वळ बौद्धिक शिक्षणापासूनचे तोटे इतके उघड आहेत की, त्याबाबद चर्चा करण्याची जरूर नाही. श्रीमंत, सरदार वगैरे लोकांच्या मुलांसाठी तर धंदेशिक्षण अत्यंत अवश्य आहे. व यासाठी दरएक प्रांतास अगर संस्थानास एक खास शाळा असावी. अधिक खर्चाची उपकरणे, अधिक खर्चाचे प्रयोग, नवे शोध लावणे वगैरे गोष्टी या शाळेत शिकवाव्या व प्रत्येक मुलाने हे शिक्षण घेतलेच पाहिजे अशी घनिकांवर सक्ति करावी. हल्ली घनिकांची मुले काहीच उपयुक्त शिकत