पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०६ संघास एक शाळा असावी. संघांतील खेडींगांवें शाळेपासून एकदीड मलाच्या आत असावीत. शिक्षणमंत्री व सल्लागार यांनी पहिल्याने आपल्या प्रांतासाठी अगर संस्थानासाठी एक पूर्ण व विस्तृत अशी योजना तयार करावी. या योजनेच्या धोरणाने जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या शिक्षणमंडळांनी आपल्या योजना व क्रम ठरवावे. सक्तीचे शिक्षण किंवा प्राथमिक शिक्षण यांत पांच ते बारा वर्षांच्या मुलांचा समावेश व्हावा. आठ वर्षांच्या वर सक्ति व पांच वर्षोंपासून खुषी ठेवावी. या प्राथमिक शिक्षणांत लिहिणे, वाचणे, जमाखर्च, गणीत हे विषय अवश्य असून चित्रकला, सृष्टिनिरीक्षण व व्यवहाराची तत्वे विशेषतः द्रव्य, काल व शक्ती यांचे महत्त्व ही अवश्य असावीत. याशिवाय कोणता तरी धंदा शिकवावा. तो धंदा मुलांच्या आईबापांचा किंवा मुलांच्या आवडीचा असावा. तात्पर्य, प्राथमिक शिक्षण घेतल्यावर मुलगा कुशल (Alert), आत्मविश्वासी. (Self-confident) व खटपटी (उद्योगी) बनला पाहिजे. त्याला आपण काही तरी करावे अशी काम करण्याची हौस वाटली पाहिजे. नाका व प्राथमिक शाळांना जोडून पण जरा स्वतंत्र. अशा धंद्याच्या शाळा असाव्या. त्यांत शेती, व्यापार, सुतारी, कारागिरी, शिल्प, लोहारी, वगैरे विषय मुलांना व स्वयंपाक, शिवणकाम, धुणकाम, रोग्यांची शुश्रुषा, बालसंगोपन वगैरे विषय मुलींना शिकवावे. यांत शेतकीकडेच शिकणाऱ्या मुलांची संख्या मोठी असणार, ज्या ठिकाणी शाळा काढण्याइतकी मुले शिकणारी नाहीत तेथे सुट्टीच्या दिवशी, रात्री त्यांना त्यांचे धंदे शिकविण्याची व्यवस्था करावी, शहरांतील तज्ञांनी खेडेगांवी. मोठ्या कारागिरांना वर्षाकाठी महिना पंधरा दिवस शिकवावे व मग या कारागिरांनी रोज रात्री गांवांतील मुलांना शिकवावे अशी योजना करता येईल, जी मुले पुढे दुय्यम शिक्षण घेणार असतील त्यांना प्राथमिक शाळेत धंद्याचे शिक्षण कमी पडले तरी चालेल, थोडे तरी धंदेशिक्षण प्रत्येकाला पाहिजेच. दुय्यम प्रतीच्या शाळा प्रत्येक तालुक्याचे गांव व शहर येथे पाहिजेतच, या शाळेत योग्य अशा गरीबांच्या मुलांस शिक्षक व शिक्षण