पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिक्षणविषयक तयारी . प्रत्येक संस्थानाचे स्वतंत्र शिक्षणखाते असावे. त्या खात्याचा मुख्य एक दिवाण व त्याचे सल्लागार मंडळ असावेत. हे सल्लागार मंडळ प्रत्येक जिल्यातील शिक्षणमंडळाने निवडलेल्या सभासदांचे असावे. शिक्षणासाठी लागणारों पुस्तके, वर्तमानपत्रे वगैरेंत जाहिरात देऊन चढाओढीने रचवावी. ही पुस्तके त्या त्या विषयाच्या तज्ञांच्या मंडळाकडून तपासवून जी उत्तम ठरतील ती शाळांत चालवावी. या पुस्तकांत सरकारी अधिकाऱ्यांचा हात बिलकूल असू नये. सगळ्या शिक्षणखात्यांत सरकारची ढवळाढवळ नको. सर्व सत्ता लोकप्रतिनिधि व विद्वान् यांच्या हाती पाहिजे. प्रत्येक मंडळींच्या कचेरीत एक लायब्ररी, एक वाचनालय, एक प्रयोगशाळा व एक पदार्थसंग्रहालय जरूर असावे. याप्रमाणे दर जिल्ह्यास एक मंडळ व त्याची कवेरी पाहिजे व संस्थानच्या राजधानीत युनिव्हर्सिटीशिवाय दिवाण व त्यांचे सल्लागार यांच्या कचेरीत संग्रह पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणमंडळाचे सभासद, त्या जिल्ह्यांतील तालुके व जिल्ह्यांतील म्युनिसिपालिट्या यांच्या शिक्षणमंडळाने निवडावे. शहरच्या शिक्षणमंडळांत प्रांतिक सरकार अगर संस्थानातर्फे एक जिल्हाधिकाऱ्यातर्फे एक, युनिव्हर्सिटीतर्फे एक व जिल्ह्यांतील तिद्वनांतर्फे एक असे सभासद कमेटीच्या सभासदाशिवाय असावे. याशिवाय जिल्ह्यांतील नामाकित स्त्री अगर पुरुष यांस जरूर तर नेमून घेण्याचा अधिकार मंडळाला असावा. प्रत्येक शिक्षणसंस्थेत एक वाचनालय, एक ग्रंथसंग्रह, एक प्रयोगशाळा व एक पदार्थसंग्रहालय असावें. मुलांनी आपण संपादन केलेल्या विचित्र जि नसा या संग्रहालयांत ठेवाव्या. शिक्षक व प्रोफेसर यांनी विचारविनिमयासाठी परप्रांती अगर देशी जावें व शिक्षणांत सुधारणा करण्यांत मदत करावी असा नियम असावा. विषय उत्तम शिकविण्यासाठी योग्य ती पद्धत वापरण्याची प्रत्येक शिक्षकास मोकळीक द्यावी. मुलांची परीक्षा म्हणजे वरच्या वर्गातील उमेदवारी हीच असावी. शिक्षकाला कोणी मुलगा त्या यत्तेत अयोग्य असा दिसला तर त्यास खालच्या यत्तेत घालावे. यत्ता विषयवार निराळ्या असून एकच मुलगा निराळ्या विषयांत निरनिराळ्या यत्तेत असण्यास हरकत नसावी. दरएक खेडींगांवास अगर खेडेगांवच्या