पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र.६ लोक संख्येशी खर्च लाख हिंदुस्थाना इतकाच मागसलेला होता, व त्याने शिक्षणाच्या योगाने इतक्या योड्या अवकाशांत इतके उच्च स्थान पटकावले आहे. या बाबद दुसरे देण्यासारखें उदाहरण म्हणजे फिलिपाइन बेटांचे. या बेटांनीहि केवळ वीस वर्षांच्या अवधीत हिंदस्थानच्या मागून येऊन पुढची जागा पटकावली आहे. फिलिपाइनमधील शिक्षणपद्धति बहुतेक तोंडी शिकविण्याची आहे. यामुळे तिला खर्च कमी येतो व थोड्या काळांत विद्यार्थी पुष्कळ प्रवीण हाता. ह maan येत्या दहा वर्षांत हिंदुस्थानचा शिक्षणविषयक खर्च सदतीस कोटींवर गेला पाहिजे व त्याची वाटणी खाली दिल्याप्रमाणे झाली पाहिजे. पण शिक्षणाची जात विद्यार्थ्यांची संख्या हजारी प्रमाण प्राथमिक शिक्षण ३,६४,००,००० २७००० दुय्यम शिक्षण ३६,४०,००० १४ ५२५० उच्च शिक्षण ३,९०,००० १.५ ४५०० खास शास्त्रीय शिक्षण १,३०,००० ७५० एकूण . ४,०५,६०,००० १५६ ३७५० ____ यापैकी हल्ली होणारा खर्च व तितकाच आणखी सरकार करील म्हटले तरी वीसबावीस कोटी रुपये होतील व पंधरा कोटींची भर नवे कर व कर्ज यांनी केली पाहिजे. हिंदुस्थानचे अनुत्पादक कर्ज थोडें आहे व त्यांत ही भर घालण्यास लोकांनी मागे पुढे घेऊ नये. हे शिक्षणविषयक कर्ज म्हणजे स्वराज्याचा पाया आहे. इमारत मजबूत व्हावी असे वाटत असेल तर पायांत काटकसर उपयोगी नाही. ज्याप्रमाणे शेताच्या नांगरणीत व खुरपणींत खर्च झालेले पैसे पिकांत किती तरी पटीने भरून निघतात त्याचप्रमाणे शिक्षणांत खर्च झालेले पैसे पुढें उत्पन्नांत किती तरी पटीने भरून येतील, ज्याअर्थी या पिकाचा फायदा सर्व राष्ट्राला व अनंत काळ होणार आहे त्याअर्थी हा खर्च कर्ज काढूनच करावा हे योग्य आहे व म्हणूनच येथे कर्ज काढण्याची सूचना केली आहे. एका पिढीने, एका काळच्या जनतेने हा सर्व खर्च सोसणे शक्य नाही व वाजवीहि नाही. या