पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिक्षणविषयक तयारी वरील प्रकारच्या शाळांत जाणारा काळ, लागणारा खर्च व द्यावी लागणारी फी वगैरे इतकी जबर आहे की, फारच थोड्या लोकांना यांचा फायदा घेववतो. शिष्यवृत्त्या देखील फार थोड्या असून त्या दुर्मिळ अशा मागासलेल्या लोकांकरितां आहेत. साधारणपणे बुद्धिमान् माणसे मध्यम व गरीब वर्गातच जास्त असतात; कारण लोकसंख्येचा मोठा भाग याच -लोकांचा झालेला असतो. दुय्यम व वरिष्ठ शिक्षणाची भाषा परकी, यामुळे तें शिक्षण नीट आत्मसात होत नाही. पुष्कळ गोष्टी इंग्रजीत समजल्याने व देशी भाषेत त्यांचे ज्ञान नसल्याने ते ज्ञान व्यवहारांत उपयोगांत आणण्यास मुष्कील पडते. अशा अडचणीमुळे गरीब व मध्यम स्थितीतील हुशार, उद्योगी व होतकरू मुलांना या शिक्षणाचा लाभ मिळत नाही. यापुढें खर्च भागविण्यासाठी फी वगैरे वाढू लागली तर शिक्षण घेणारांची संख्या कमी होऊन उलट उत्पन्न जास्तच कमी होईल, SET शिक्षणाच्या बाबतीत कंजूषपणा केल्याने प्रत्यक्ष ब्रिटनचे सुद्धां पुष्कळ अहित झाले आहे. जर्मनी व जपान या देशांनी शिक्षणाची जी व्यवस्थित मांडणी व शिस्त लावली आहे तिजपुढे ब्रिटनची व्यवस्था फारच फिक्की पडते व यामुळे जर्मन लोकांपुढे ब्रिटनला महायुद्धांत कित्येक वेळा हार खावी लागली. लढाईतील कोणतीहि नवीन पद्धति जपान व जर्मनी याच दोन राष्ट्रांनी. पहिल्याने वापरली व मग ती पद्धति इतरांनी उचलली. पण मूळ उत्पत्ति, प्रारंभीची कल्पकता जर्मन व जपान यांचीच होय. ही ज्या ठिकाणी ब्रिटनची स्वतःची, मालक गणल्या किंवा म्हणविल्या जाणाऱ्या राष्ट्राची, स्थिति तेथे गरीब बिचाऱ्या गुलामप्राय ताबेदारीत रखडणाऱ्या हिंदुस्थान देशाचे हाल काय सांगावे ? जान -हिंदुस्थानांत आतां आपणांस स्वराज्याची मेढ उभारावयाची आहे व त्यासाठी पाया म्हणून शिक्षणाची योग्य व्यवस्था केली पाहिजे. हे शिक्षण यापुढे असे पाहिजे की, त्यामुळे हे शिक्षण संपादन केलेले तरुण स्वराज्य चालविण्यास सर्वथैव योग्य व्हावे. इतकेच नव्हे तर स्वराज्यासाठी लागणारे आर्थिक व सामाजिक सामर्थ्य त्यांच्यांत उत्पन्न व्हावे. याबाबद हिंदस्थानाने जपानचा कित्ता घ्यावा म्हणजे बरें. तो देश थोड्याच वर्षांपूर्वी