पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य करण्यास नाखुष व नालायक होतो हा त्यांचा अनुभव आहे हे होय. वडिलार्जित धंदा त्या मुलांना न आवडेल. तर न आवडो, पण दुसरा कोणताहि किफायतशीर धंदा या मुलांना शाळेत गेल्यावर येत नाही हे त्यांच्या नापसंतीत आणखी भर घालते. ही झाली प्राथमिक शिक्षणाची रड. दुय्यम व वरिष्ठ प्रकारचे शिक्षण घेतलेले जवान तरी शेतकी, शिल्प, कारागिरी, व्यापारधंदे यांत प्रवीण होतात म्हणावे तर तेहि होत नाही. फक्त कारकुनी करण्यापुरतें लिहिणे, वाचणे व गणीत हे विषय या तरुणांना शिकविलेले असतात. इतिहास व समाजशास्त्राचे या शाळांतून जें शिक्षण मिळतें तें व्यवहारांत वापरण्याइतके मुळीच नसते. पुष्कळशी निरुपयोगी माहिती या विषयांत शिकविलेली असते व तीहि व्यवस्थित व पद्धतशीर मांडलेली नसते. राजकारणासारख्या खऱ्या लोकोपयोगी शिक्षणाला तर फांटाच दिलेला असतो. शिल्प व वैद्यक यांचे थोडे फार शिक्षण मिळते. पण त्यांत सुद्धां हिंदी लोकांना परदेशीय कारखानदारांचे अडत्ये अगर गुमास्ते बनविण्यापलीकडे कांहीं राम नसतो. तात्पर्य, शाळांतून शिकून बाहेर पडलेला मुलगा कोणाचा तरी नोकर अगर ताबेदार रहावा याच धोरणाने सर्व शिक्षणाची मांडणी केली आहे व ही गोष्ट आज तीस चाळीस वर्षे पुढाऱ्यांच्या लक्षात आली आहे. या शाळांना ते "हमालखाने' म्हणतात. पण असे हमालखाने नव्हत अशी शाळा अद्याप निघाली नाही. स्वतंत्र खाजगी शाळा निघाल्या, राष्ट्रीय शाळा निघाल्या. पण त्यांत शिकविणारे बहुतेक आंधळेच असल्यामुळे त्यांच्या माळेचेच मी ते तयार करतात, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशोद्धारक शिक्षण म्हणजे काय, ते कसे असते, कसे देतात व द्यावें या बाबींचा विचारपूर्वक अभ्यास करून कष्टपूर्वक शिक्षण देणारी माणसें विरळा. यामुळे नांवांत भेद पण शिक्षणक्रमांत, पद्धतींत व फळांत भेद नाही असेंच शिक्षण अद्याप मिळत आहे. नवीन योजना तयार करून त्याप्रमाणे आपण स्वतःची तयारी करून, ती पद्धत अमलांत आणून ती विद्यार्थ्यांत उतरून दाखविणारी शाळा अद्याप नांवलौकिकास आलेली नाही. मग ती पुढे केव्हां येईल ती येवो.