पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण सहावा MINS शिक्षणविषयक तयारी हिंदुस्थानाला साधारणपणे निरक्षर लोकांचा देश असे म्हणण्याचा प्रघात आहे. असा किताब हिंदुस्थानास कां मिळतो याचा विचार करतांना हिंदुस्थानसरकार शिक्षणाकडे किती पैसा खर्च करते हे मुख्यत्वे पाहिले म्हणजे झाले. सन १९१६-१७ साली जगांतील राष्ट्रांनी लोकसंख्येच्या शंभर माणसांना शिक्षण देण्यासाठी किती पैसे खर्च केले याचे कोष्टक खाली दिले आहे. नाला, मीर देशाचे नांव शिक्षणखर्च ... शिकणारी मुले प्रमाण हिंदुस्थान ४ि५. १०. २.९ जपान २६०. ४९३ १४.३ ग्रेटब्रिटन ६३० ५ ६८ १६.५ कानडा १६७० ,५४८ T संयुक्त संस्थाने २७०० ८ ०३ स्त्रियांच्या लोकसंख्येशी जर मुलींची शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या तोलली तर हे प्रमाण भलतेच कमी पडेल. स्त्रियांचे शिक्षण मागे असण्याचे कारण या शिक्षणाच्या योग्य सोईचा अभाव व लोकांच्या विशिष्ट चालीरीति या दोन गोष्टी होत. वर सांगितल्याप्रमाणे लोकसंख्येपैकी निम्मी माणसे अडाणी राहिल्यावर पुष्कळ गोष्टींत आपणांस अडचणी येतात हे उघड आहे. त्यांतल्या त्यांत जे थोडें बहुत शिक्षण हल्ली देण्यांत येते ते सर्व अव्यावहारिक असते. मिळालेली माहिती व्यवहारांत-रोजच्या व्यवहारांत कशी वापरावी व कशी अवश्य आहे हे कोठेच शिकविण्यांत येत नाही. सर्व शेतकरी व धंदेवाले लोक आपली मुले शाळेत घालण्यास नाखुष असतात, याचें कारण हे की, शाळेत जाऊ लागलेला मुलगा आपला वडिलार्जित धंदा