पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र. ६ वें. प्र० ११. यासाठी त्याला योग्य मान प्रत्येक ठिकाणी धर्म, समाज, राजकारण, धन, अधिकार वगैरे बाबतीत मिळाला पाहिजे. पदवी, मान, किताब, विशिष्ट सामर्थ्य, विशिष्ट पोषाक, चिन्हें ही असला मान प्रदर्शित करण्याची साधने आहेत व त्यांचा देशहिताचे दृष्टीने योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच-. प्रमाणे बिल्ला, पोषाक किंवा अंलकार, इनाम, जहागीर, वर्षासने ही योग्य वर्तनाला उत्तेजन देणारी आहेत. यांचा उपयोग चांगल्या प्रकारें, झाला पाहिजे. ज्याप्रमाणे सरकार या गोष्टी करते. त्याचप्रमाणे स्थानीक संस्था, जनता यांनी या केल्या पाहिजेत. या गोष्टी करणे दोन्ही पक्षांना श्रेयस्कर आहे. मान देणाराची गुणग्राहकता व मान मिळविणाराची योग्यता या दोन्ही गोष्टी त्यांत जगाच्या निदर्शनास येतात: क.