पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धार्मिक तयारी पडून प्रतित झाला असेल तर त्याला परावर्तनास मोकळीक ठेवण्यात अर्थ नाही. पण चुकून किंवा जुलमाने जर कोणी पतित झाला. असेल तर त्यास शुद्ध करण्यास हरकत नाही. ज्या इसमाला आपण शुद्ध व्हावे असे वाटत असेल त्याने पहिल्याने मला शुद्ध करून घ्या अशी मागणी करावी व झाल्या चुकीबद्दल योग्य. दंड द्यावा. शिवाय ज्या लोकांत त्याला यावयाचे त्यांच्यासारखे वर्तन त्याने एक वर्ष उमेदवार म्हणून वागावे. असे केले म्हणजे धर्माला क्षणिकत्व न येतां माणसाची कळकळ उघड होईल. त्याला उमेदवारी झाल्यावर योग्य संस्कार करून धर्मात परत घेण्यास हरकत नसावी.' नवीनच कोणा इसमास हिंदु धर्मात यावयाचे असल्यास त्यासहि हिंदु धर्मात येण्याची परवानगी असावी. ! त्याला वरीलप्रमाणेच अट पाहिजे. उमेदवारी, दंड, प्रायाश्चित व संस्कार इतके झाल्यावर कोणालाहि हिंदी धर्मात येतां यावे अशी सवलत ठेवण्यास हरकत नसावी. कोणत्या जातींत कोणाला घ्यावे हे त्या त्या जातीने ठरवावें अगर पतितांची व परिवर्तितांची दुसरी एक स्वतंत्र जात करावी. जातिधर्म ढिले करावे याबाबद सामाजिक सुधारणेत विचार केला आहे, तसाच अस्पृश्यत्वाचा विचार सामाजिक सुधारणा या प्रकरणांत केला आहे. रोटीबेटीव्यवहार सामाजिकच समजण्यांत यावा. वर्ण, आश्रम व धर्म हे अनेक पिढ्यांच्या आचरणशुद्धीने वर चढावे अगर खाली जावे. विविक्षित कसोटीला प्रत्येक वर्ण, आश्रम धर्म उतरला पाहिजे. पहिल्याने धर्मांतर, मग आश्रमांतर व मग वर्णांतर अशी ही चढती योग्यता असावी, प्राचीन हिंदी शास्त्रकारांची या गोष्टीला संमति आहे. योग्य आचरणाचे बक्षिस म्हणून एकाद्या व्यक्तीला एक पिढीपुरते उच्च वर्णात दाखल करावे. असे केल्याने श्रेष्ठ आचरणाला प्रोत्साहन मिळेल. देशकार्यासाठी स्वार्थत्याग, धाडस किंवा अलौकिक कृति करणारांचा असा गौरव करणे सर्वथैव योग्य आहे. त्याचप्रमाणे नीच वर्तन, देशबडवेपणा यांना बहिष्काराची शिक्षा पाहिजे, या सामाजिक निबंधांना कायदेशीर स्वरूप खास ठरावाने देतां यावे. तात्पर्य समाजाच्या ठिकाणी काही विशिष्ट निग्रहानुग्रहशक्ति पाहिजे व ती सर्वसंमत पाहिजे. अशा रीतीने समाजाला जोम येईल. त्यांत उत्साह वाढेल, तेजस्विता प्रगट होईल असा वाव आपण अवश्य ठेवला पाहिजे, अलौकिकत्व हे केव्हांहि मानाईच आहे व