पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र.६ पाडल्या म्हणून घाबरण्याचे कारण नाही. योग्य ठिकाणी नव्या भिंती घालून मर्यादा उत्पन्न केली म्हणजे नवे दिवाणखाने जास्त प्रशस्त व जास्त उपयोगीच होतील. , पाश्चात्य देशांत शाळा, कालेजें, कचेऱ्या व कारखाने यांत संधाने किंवा सहकारितेने काम करण्यांची शिस्त लावण्यांत येते. या शिस्तीला बळकटी यावी म्हणून सक्तीच्या लष्करी शिक्षणाची मदत घेण्यात येते. सगळ्या शाळांतून, कालेजांतून हतकेच नव्हे तर प्रत्यक्ष तुरुंगांतून सुद्धा आपली आपणच सर्व शिस्त लावावी व व्यवस्था करावी असे शिक्षण देण्यात येत असते. कारखान्यांत मालक व मजूर यांच्या संयुक्त मंडळामार्फत काम करून घेण्याकडे तेथे प्रवृत्ति आहे. असे करण्याने राष्ट्र म्हणजे सर्व लोकांचे अशी भावना व्हावी, ज्याला त्याला आपलेपणा वाटावा, दुसऱ्यासाठी आपले मन आवरून धरण्याची सवय लागावी, एकमेकांच्या सल्ल्याने तंटे मिटविण्याची बुद्धि व्हावी अशी योजना आहे. पूर्वीची मोडलेली शिस्त नव्या परीस्थितीत नवीन स्वरूपांत कशी उत्पन्न होते व त्यापासून देशाचे कसें हितं होते हे दाखविण्यासाठी ही माहिती दिली असून याच धर्तीवर आपल्याला काम करता येईल व ते करण्याचा. उपक्रम केला पाहिजे हे सांगण्याचा येथे मुख्य उद्देश आहे. ढिली केलेली धार्मिक बंधने याप्रमाणे शिस्तवार बळकट करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. .: धर्माची अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पतितपरावर्तन होय. पतितांना परावर्तनाची सवड ठेवावी कां नाही याबाबद दोन्ही बाजूने पुष्कळ सांगतां येईल, परावर्तनाची सवड नसली तर मनुष्य आपले वर्तन फार जपून करील व तो नियमांना तुच्छ लेखणार नाही, हा मोठा गुण आहे. परावर्तनाला जागा असली तर चुकीच्या दुरुस्तीस वाव असतो खरा; पण त्यामुळे धर्माच्या बाबतीत फार ढिलाई होते व चंचलता येते. काहीं असले तरी सर्व धर्मानी ही सवलत ठेवली असून प्राचीन काळी ही गोष्ट प्रचारात होती. ज्या वेळी वर्णव्यवस्था ढिली होती त्याच वेळी पतितपरावर्तन शक्य होते. पण धर्म म्हणजे एक चेष्टेचा विषय होऊ नये म्हणून ही सवलत काढून टाकण्यात आली. परावर्तन करावयाचे असेल तर तो इसम. पहिल्याने पतित कसा झाला हे पाहिले पाहिजे, तो काम, क्रोध किंवा लोभ यांना बळी