पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिक्षणविषयक तयारी ०९९ स्वच्छता; दुसऱ्या पंथाविषयीं व धर्माविषयी आदरबुद्धि, देशाभिमान, शिस्त, निश्चयीपणा व दुसन्यासाठी कळवळणे हे गुण त्या धर्मात उत्पन्न झाले पाहिजेत. - शाळांतून अगदी तळापासून शेंड्यापर्यंत सर्व यत्तांतून धर्म व नीति यांचे पाठ असावे. सर्वव्यापी तत्वे नेहमी आचरणांत यावी अशी व्यवस्था शाळांतून पाहिजे. वडील व गुरुजी यांच्या पायां पडणे, त्यांच्या आज्ञेत वागणे, खरे बोलणे, दुसऱ्याच्या उपयोगी पडणे, या गोष्टी सर्वत्र आचरणांत पाहिजेत व हे वळण बाळपणापासून लागले पाहिजे. हल्ली हिंदुस्थानांत अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोकांना सामाजिक शिस्त कशी लागावी हा आहे. जुन्या मताचे लोक 'इंग्रजी शिक्षणाने वडिलांचा मान व शिस्तीचे वर्तन नाहीसे झाले' असे म्हणतात व ही गोष्ट -खोटी नाही. सुधारणा म्हटली म्हणजे असे व्हावयाचेच. यःकश्चित घरांत आपण सुधारणा करूं लागलो तर जुन्या भिंती पाडाव्या लागतात व त्यामुळे घराला भकासपणा येतो. पण नव्या भिंती घातल्या म्हणजे घराला नवीन शोभा येते. त्याचप्रमाणे पूर्वीची शिस्त व वडिलांचा मान गेला ही गोष्ट जरी आज दिसली तरी लवकरच नवी शिस्त व पुढाऱ्यांचा मान या गोष्टी देशांत उत्पन्न होतील. एकदां विचारपूर्वक आचरण करण्याची संवय लागली म्हणजे विचारांची शिस्त व विचारी माणसांना मान साहजिक उत्पन्न होतो व या गोष्टी जास्त टिकाऊ व अभिमानार्ह असतात. पाश्चात्य देशांत असेच झाले. विचाराला सुरुवात होतांच धर्मगुरूंचा मान गेला इतकेच नव्हे तर बायबल देखील खोटे ठरलें, योग्य घिरे नाहीसे झाल्याने समाजाचा डोलारा ढासळेल असे त्या वेळी पुष्कळांना वाटले. पण तसे न होता संघांची शिस्त व पुढान्यांचा दाब उत्पन्न होऊन समाज सुधारतच गेला. हल्ली सुद्धा पाश्चात्य देशांत स्त्री व पुरुष या दोन घटकांच्या स्पर्धेमुळे व स्वतंत्र वागण्याच्या हौशीमुळे काय होईल . अशी धास्ती वाटतच आहे. आपल्या हिंदु धर्माची इमारत या पाश्चात्य धर्मापेक्षा पुष्कळ रुंद व मजबूत पायावर उभारलेली आहे. यासाठी तिच्यांत नव्या व्यवस्थेला योग्य अशी सुधारणा करण्यासाठी काही भिंती थोडा वेळ