पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मावी हिंदी स्वराज्य [प्र०.६ येणार नाहीत. - मजूरीपेक्षां भांडवल श्रेष्ठ ही गोष्ट केव्हांहि मान्य करावी लागेल. नुसती मजूरी कारखान्यांत कांहींच करू शकणार नाही, पण नुसतें भांडवल काही तरी करील. भांडवलाचा मालक स्वतःच काम करील तर भांडवलापासून काही तरी उत्पन्न काढील, पण भांडवलाशिवाय मजूर काहीच करू शकणार नाही. यासाठी भांडवलासाठी थोडा नफा जास्त ठेवावा म्हणजे झाले. नवीन घटनेत पुढे येणाऱ्या संकटांची तरतूद अगाऊ करून ठेवावी. मागून येणान्याला हे धोके टाळण्याचा प्रयत्न करतां येतो हाच फायदा. पहिल्याने काम करणाऱ्याने धोके सोसलेले असतात पण त्या वेळी प्रतिस्पर्धी कमी असल्याने त्याला नफा जास्त मिळतो. याप्रमाणे " कोठे कांही कोठे कांहीं । एक आहे एक नाही" ही गोष्ट खरी.. " तात्पर्य, ज्या ज्या गोष्टी केवळ जोराने, सामर्थ्याने, सक्तीनें घडवून आणतां येत नाहीत त्या धर्माच्या सहाय्याने प्रेमाने, दयेने घडवून आणल्या पाहिजेत. धर्माचे क्षेत्र जास्त म्हणजे हेच. सर्व धर्मगुरूंनी एकत्र बसून याप्रमाणे विचार केला पाहिजे. असे न करतां जर आपण एकमेकांशी मांडत बसलो तर आपणा सर्वांचाच नाश होणार आहे हे आपण लक्षांत ठेवले पाहिजे, दोघांचे भांडण व तिसऱ्याचा लाभ हा जगाचा नियम आहे व आपल्याला हा अनुभव चांगला ठसठशीतपणे आलेलाच आहे. हा अनुभव जमेस धरून आपण सर्वांनी वागण्याची खबरदारी घेतली पाहिजे व त्यांत आपले कल्याण आहे. निना हिंदु लोकांचा धर्म म्हणजे नुसती कवाईत होऊन गेली आहे. ही पद्धत पार बदलली पाहिजे. मंत्रांचा गोषवारा समजेल इतकें संस्कृत प्रत्येक गृहस्थ व भिक्षुक यांस झाले पाहिजे. धर्मात उच्च तत्वे आहेत ती आचरणांत येऊन त्याप्रमाणे माणस थोर झाला पाहिजे. धर्माच्या प्रत्येक पंथाने आपली तत्वे लहान लहान पुस्तकांत ग्रथित केली पाहिजेत. या तत्वांत नीतीची तत्वें, वर्तनाचे नियम व लोकांच्या उपयोगी पडण्याचे धोरण ही स्पष्ट सांगितलेली असावी. त्यांत आपलेपणाचा अभिमान उत्पन्न व्हावा, त्याप्रमाणे वागण्याची हौस वाटावी व त्याप्रमाणे आचारण करीन असा निश्चय करावा अशी मांडणी असावी. तत्वाप्रमाणे आचरण, शारीरिक वगैरे