पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धार्मिक तयारी मालक आणि मजूर यांचा संबंध असाच धर्माने हाती घेण्यालायक आहे, एकमेकांचे हित, एकमेकांचे अहित हे या व्यवहारांत फार गुंतलेलें असते. तथापि मालक मजुराला व मजूर मालकाला शत्रु समजत असतो. इतर देशांत ही भांडणे फार विकोपास गेली असून त्यांचा निकाल लावणे दुर्घट झाले आहे. आपण या बाबतीत वेळीच सावधगिरी 'घेणे बरें. आपल्याकडे कारखान्यांचा प्रारंभ देशाच्या उत्कर्षांसाठी आपण करणार आहोत. याच वेळी काय केल्याने हे तंटे पुढे होणार नाहीत ते आपण पाहिले पाहिजे. इतर देशांनी अनेकविध समाजरचना करून पाहिली. पण प्रत्येक रचनेत कोणता तरी एक वर्ग प्रबळ होऊन दुसऱ्यांना जाचक होतो असें दिसले व शेवटी आधुनिक समाजशास्त्रज्ञांनी चातुर्वण्य संस्थाच चांगली असे ठरविले आहे. (१) विचार करणाऱ्या लोकांचा वर्ग; याने विचार करून कायदे करावे. (२) दुसरा अंमलबजावणी करणाऱ्या लोकांचा वर्ग; यांनी नुसती ठरलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी. (३) तिसरा द्रव्य पुरविणारा वर्ग; याने सर्व कायद्यांची अंमलबजाणी होण्यासाठी लागणारे द्रव्य पुरवावें. व (४.) कामे करणाऱ्यांचा वर्ग; याने चारी वर्णांना संमत अशी कामें करावी. या पद्धतीत कोणाहि वर्गाला स्वतंत्र सत्ता नाही, व यामुळे इतरांवर जुलूम करता येत नाही, कायदे करणारांनी भलता कायदा केला तर त्याची अंमलबजावणी होणार नाही, अंमलबजावणींत जुलूम होईल तर तसा कायदा नाही. दोघेहि स्वर वागतील पण त्यांना द्रव्यबल नाही व तिघेहि एक झाले तरी त्यांचे काम कोण करणार ? अशा रीतीने चौघांच्या संमतीशिवाय काही होणार नाही व तिघे एक झाले म्हणजे ते चौथ्याला. आवरतील, अशी ही चातुर्वर्ण्य संस्था होती व तीच पाश्चात्य देशांत मान्य होत चालली आहे. अशीच चातुर्वर्ण्य संस्था प्रत्येक कारखान्यांत पाहिजे. सरकार हा काखान्यांतील विचारी लोकांचा वर्ग. याने कारखान्यासाठी कायदे करावे. स्थानिक अधिकारी यांनी या कायद्यांची अंमलबजावणी करावी. भागीदारांनी पैशाचा भाग पुरवावा व मजुरांनी मेहनत पुरवावी असे चार प्रकारचे सर्व जण एकत्र होऊन. भागीने, एकमेकांच्या सल्याने, नफ्यांत भाग ठेवून व्यवहार चालावा म्हणजे मालक व मजूर यांत तंटे होण्याचे प्रसंग फार भा...हिं...स्व...७