पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६ भावी हिंदी स्वराज्य [प्र०.५ तेच इतर लोक करतात. आंधळ्यांच्या माळेप्रमाणे चाललेला हा कारभार पाहून विचारी माणसे फार उद्विग्न होतात, योग्य कामें करावयाची सोडून देऊन बाळंत होण्याचे दवाखाने निघतात; पण त्या दवाखान्यांत जी स्त्री एकदां गेली ती फिरून तिकडे जाण्याचे नांव काढीत नाही. "नकोरे बाबा ते हाल, त्यापेक्षा मी घरी मेल्ये तरी चालेल" असे चांगल्या सुशिक्षित व संपन्न स्त्रियांचे उद्गार ऐकावयास सांपडतात. विलायतेंत महायुद्धांत पन्नास कुटुंबांच्या टोळ्या केल्या होत्या. त्यांत एका स्त्रीने साऱ्यांचा स्वयंपाक करावा, एकीने साऱ्यांची धुणी धुवावी, एकीने साऱ्यांचे दळण दळावे, दोघींनी साऱ्यांची मुले संभाळावीं. चौघींनी साऱ्यांचे अन्न कारखान्यांत पोचवावें. दोघींनी झाडलोट, दिवाबत्ती वगैरे करावी व बाकीच्यांनी कारखान्यांत कामास जावे असे करीत. ही पद्धत फार सुखावह, थोड्या खर्चाची व जास्त उत्पन्नाची आहे असे आढळून आले आणि हिंदुस्थानांत चार भावांच्या बायका एकत्र रहावयास नाकबूल ! एखाद्या मोलकरीण बाईच्या हातापायां पडून बाळंतपण, आजारीपण वगैरेसारखे दिवस काढून घेतील, पण आपली लाऊ, नणंद अगर भावजय यांची मनधरणी करावयाच्या नाहीत. भाऊ दुसऱ्याचे घरीं नोकर राहील, त्याचे वाटेल ते काम करील पण घरी आपल्या बापाचें अगर भावाचे ऐकावयाचा नाही. हिंदु किंवा मुसलमान साहेबाला बुटासकट देवळांत येऊ देतील पण आपल्या देशबांधवाला येऊ देणार नाहीत. साहेबाचे पंगतीस बसून गोसूकरमांसभक्षण करतील पण आपल्या भाऊबंदांनी सांगितले तर त्यांना बरे वाटेल असें कर्म करणार नाहीत. ही जी दर्दशा करणारी खोड आपल्या देशांत पसरली आहे ती धार्मिक चळवळीने घालविली पाहिजे. ही नैतिक आचरणाची बाब आहे. इंगजी पोषाक, इंग्रजी चेहयाची ठेवण ही सर्वांना पटते. इंग्रजी जोडा देवघरांत किंवा भोजनगृहांत जातो. पण हिंदी पोषाक कर म्हटले तर मुसलमानास मान्य नाही व मुसलमानी पेहराव हिंदूस मान्य नाही. सोय गैरसोय, व्यवस्था अव्यवस्था, कमीजास्त खर्च, वगैरेचा हा प्रश्न नसून केवळ अंध अनुकरणाचा, गतानुगतिकत्वाचा हा परिणाम आहे व म्हणून याचा निषेध करावयाचा. चांगले असेल तर बेलाशक घ्या पण अहितकर घेऊ नका..