पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धार्मिक तयारी आपले अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजेत. अगदी अवश्यक वस्तूंची गोष्ट निराळी. कितीहि कमी उत्पन्न असो, त्या सर्वांनाच पाहिजेत. पण चैनीच्या वस्तूंची काटकसर आपले उत्पन्न पाहून अवश्य केली पाहिजे. इंग्रजी पोषाक, इंग्रजी थाटमाट, इंग्रजी आहारविहार, इंग्रजी खेळ. इंग्रजी व्यसने या गोष्टी आपल्या देशाला दारिद्यांत बुडवून दाबून धरणाऱ्या आहेत. यामुळे इंग्रजांचा माल खपतो, त्यांना नफा होतो घ आपले हाल होतात असे दोन्हीकडून नुकसान आहे. ही गोष्ट धार्मिक उपदेशकांनी नेहमी लोकांपुढे मांडली पाहिजे, लोकांनी तीध्यानात ठेवली पाहिजे व त्याप्रमाणे प्रत्येकाने आचरण केले पाहिजे. मनुष्यप्राणी उत्सवप्रिय आहे, पण जीव जाईपर्यंत उत्सव करणे गैर आहे. जगलों वांचलों तर अनेक उत्सव करतां येतील. से एखादा जुगारीत हरलेला मनुष्य जसा बेभान होऊन पण लावीत सुटतो तशीच अवस्था हिंदुस्थानाची झालेली दिसते. मागचा पुढचा विचार न करतां तो धूम कोणीकडे तरी चालला आहे. आपण काय करतो, त्याचा परिणाम काय, हे किती दिवस निभेल, याचा शेवट काय होईल याचा बिलकूल विचार न करता लोक करतात तर आपणीह करावे म्हणून तो आपल्या गळ्याला तात लावून घेत आहे. इतर देशांत हातपाय चालतात तोवर आजारीपण, म्हातारपण, अस्मानीसुलतानी यांसाठी प्रत्येकजण तजवीज करीत असतो. यासाठी विमा उतरणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या तिकडे आहेत. पण अशी कांहींच योजना हिंदुस्थानांत नाही. ज्या काही थोड्या विमा उतरणाऱ्या कंपन्या हिंदुस्थानांत आहेत त्या बहुतेक परदेशी लोकांनी आपल्या जातभाईसाठी काढलेल्या. बहुतेक कंपन्यांत हिंदी व युरोपियन यांचे दर, सवलती वगैरे निराळ्या व या कंपन्यांचा फायदा घेणारे थोडे. जणूं काय आपणांस अशा आपत्ती येणारच नाहीत अशा थाटाने सर्वांचा कारभार चालला आहे. शेतकऱ्याकडे पूर्वी पंवांत दाणे ठेवीत. एक सालचे दाणे संग्रही असत व हाच संग्रह आपत्काली उपयोगी पडे; पण हल्ली कोणाकडे पेव म्हणून नाही. जरा पैसे दिसले तर रिस्टवाच व मोटार यांत फडशा ! आपत्काली या असल्या जिनसा घटोत्कचाच्या जिनसांप्रमाणे आपल्याच नाशाला कारणीभूत व्हावयाच्या, शहाणे म्हणविणारे लोक जे विचार करतात