पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र.६ II विलायती कपड्यांचा जोड व दुसरा खादीचा जोड ठेवणारी मंडळी फार झाली आहेत. म्हणजे खर्च कमी होण्याच्या ऐवजी तो वाढला मात्र, अशी कोणत्याहि तत्त्वांत ढोंग मिसळण्याची संवय आपल्या लोकांत आहे ती गैर आहे, चांगले धर्मात्मे पुढारी फसतात ते असल्या लपंडावानेच, महात्माजींच्या व्याख्यानास जिकडे तिकडे खादी पाहून लोकांना हे आपले म्हणणे पटले, याचा अमुक परिणाम होईल असे त्यांनी समजावे तों परिणाम उलट ! सरकार धूर्त; पण तेसुद्धां केव्हां केव्हां फसते. गांधीटोपी घालणारा म्हणजे गांधींच्या मताचा असा समज सरकारचा पहिल्याने झाला. पण पुढे या टोपींत काही अर्थ नाही, लोक ही एक गम्मत म्हणून वापरतात असे पाहून सरकारने तिजकडे दुर्लक्ष केले. परकी राष्ट्र अशा या खोडसाळपणाने हिंदुस्थानावर विश्वास ठेवण्यास धजत नाहीत. हिंदुस्थानी माणसांची सर्वत्र जी कमी किंमत आहे त्याचे, हे ढोंग अंशतः कारण आहे. आपले स्वतःचे भाईबंद देखील अशा ढोंगाने फसतात. अशा प्रकारे चैन वगैरेचा खर्च वाचवून तो संग्रही ठेवावा. प्रत्येक घरंदाज किंवा सभ्य म्हणविणाऱ्या माणसाजवळ त्याच्या नेहमीच्या खचाला दोन वर्षे पुरेल इतका संग्रह असलाच पाहिजे व त्याच्या नेहमीच्या खर्चाला तीस वर्षे पुरेल इतका संग्रह म्हणजे संग्रहाची पराकाष्ठा असावी. यापेक्षा जास्त संग्रह असेल तो नेहमीं पेढ्यांवर व्यापारांत गुंतलेला असावा. प्राचीन आर्यांचा संग्रह व व्यय करण्यासंबंधाचा हाच नियम आहे व तो अगदी रास्त आहे. हल्ली संग्रह किती असावा याचा काही नियमच नाही, ही संग्रहाची हाव चांगली नाही. थोर म्हणविणारी माणसे जर संग्रह करण्यातच गुंतली तर इतर माणसे त्यांचा तोच कित्ता गिरविणार, अशा स्थितीत राष्ट्रीय कामें, कारखाने, उद्योगधंदे वगैरेंना पुरेसे पैसे मिळाले नाहीत तर आश्चर्य काय ? हिंदी इसमाचे सरासरी माणशी उत्पन्न वर्षाचे रुपये पचवीस सव्वीस आहे व इंग्रज गृहस्थाचे माणशी सरासरी उत्पन्न वर्षाचें पांचशे रुपये आहे व या दोघांचे चैनीचे माप पहावे ते एक! मग हा गरीब मनुष्य अन्नापाण्यावांचून उपाशी मेला, राजकीय वगैरे बाबींत त्याला पुरेसे द्रव्य नाही म्हणून गप्प बसावे लागले, उद्योगधंद्यांत नेहमी हात आखडता घ्यावा लागला व लोकांच्या तोंडाकडे पहावे लागले तर त्यांत आश्चर्य काय ? प्रत्येकाने