पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धार्मिक तयारी सेवक, जल संतरण, बालशुश्रूषा ही कामें बायकांनी बायकांसाठी करावीत. स्त्रीपुरुषसंबंध अनीतिवर्धक होतो. ज्ञानी माणसें देखील त्यापासून आपला बचाव करूं शकत नाहीत. म्हणून बायकांसाठी करावयाची सर्व कामें, हमाली गाड्या, घोडी, मोटारी, तिकीटें घेणे देणे वगैरे बायकांनीच करावी. बायकापुरुषांचा संबंध फक्त बहुजनसमाजांत, त्यांच्या घरच्या पुरुषासमक्ष मात्र यावा. स्त्रीपुरुषसंबंधांत आपली महाराष्ट्रीय समाजाची चाल उत्तम आहे. मुसलमानी गोषा एका टोकाला व युरोपीय मोकळेपण दुसऱ्या टोंकाला, दोषोत्पादक आहेत. ही दोन्ही टोंके सोडून मध्यम पद्धत उत्तम समजली पाहिजे. यापुढे समाजांत जी संघटना अमलात आणावयाची आहे तिच्यासाठी एकत्र येणे, एकत्र विचार करणे व एकत्र वागणे व कामें करणे यांची संवय जितकी लागेल तितकी हवी आहे व यासाठी असले प्रसंग आणतां येतील तितके घडवून आणून त्यांस देशहिताचा विचार जोडला पाहिजे. व्यापार वृद्धि व्हावयाची म्हणजे प्रवासाच्या सोई जास्त वाढविल्या पाहिजेत, पूर्वीची आपली पडशी घेऊन जाण्याची पद्धति स्वातंत्र्याला पोषक आहे. या पद्धतीत प्रत्येक इसम स्वावलंबी असतो व समवायकरणाला हीत थोडा फेरफार केला पाहिजे. शाळेतील विद्यार्थ्यापासून तो संन्याशापर्यंत टोळ्यांनी प्रवास करण्याची पद्धत आपण स्वीकारिली पाहिजे. या टोळीची कामें आळीपाळीने वाटून घ्यावी. उदाहरणार्थ, बाजारहाट करणे एकाकडे, स्वयंपाक करणे एकाकडे, धुणी धुणे एकाकडे, भांडी घासणे, जागा स्वच्छ ठेवणे एकाकडे, दिवे बत्ती अंथरुणे वगैरे एकाकडे याप्रमाणे कामें वाटावी. तसेच फिरतीच्या गांवची राजकीय चौकशी एकाकडे, औद्योगिक एकाकडे, शिक्षणविषयक एकाकडे, धार्मिक एकाकडे, याप्रमाणे कामें वांटून त्यांनी माहिती गोळा करावी. रात्री किंवा रिकामपणी त्याबाबद चर्चा करावी. जरूर तर तेथें व्याख्याने द्यावीं अगर ऐकावी. आपले विचार लोकांस द्यावे व आपण त्यांचे घ्यावे व याप्रमाणे ही टोळी कांहीं पायौं, कांही गाडीने, कांहीं आगगाडीने दरसाल महिना पंधरा दिवस प्रवास करून यावी. एका गांवची, एकमेकांच्या ओळखीची, साधारण समवयस्क व समसुखदुःखी अशी ही मंडळी असावी. बरोबरीचा