पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[४]

कलहाग्नि आंतल्या आंत धुमसून स्फुलिंगरूपाने बाहेर पडतो व मत्सरभाव व्यक्त होतो. दुसरे मोठे अनहित असें होते की, निरुद्योगीपणा यदृच्छेने वाढतो. कुटुंबांतील कर्ता पुरुष-पिता, बंधु, चुलता जो कोणी असेल तो--अब्रूस भिऊन सर्वांचे पोषण करतो, परंतु ज्याला चिंतारूपी रोग रात्रंदिन त्रास देत असतो. एखादा मुलगा दुर्वर्तनी निपजला तर त्याचेही प्रायश्चित्त बाकीच्यांस भोगणें प्राप्त होते. अशी स्थिति दिसून येते. विशेष महत्वाचा दुसरा तोटा हा आहे की, अविभक्त स्थितीत स्वावलंबन व विचारस्वातंत्र्य, या दोन गुणांचा विकास बिलकुल होत नाही. कारण मुलांच्या मनांत पुष्कळ गोष्टींविषयीं उच्च कल्पना आल्या तरी उत्साह प्रकट करता येत नाही. स्वतंत्र असतांना बुद्धीचा विकास करण्यास जितकी सवड सांपडते तितकी परतंत्र स्थितीत नसते. मोठ्या प्रौढ झालेल्या मुलांची स्थिति बरेच अंशी नोकरांसारखी असते. आपले जे वरिष्ठ असतील त्यांना प्रिय असलेल्या मतांप्रमाणे वागण्यास नोकरांस स्वतंत्रता असते, परंतु ज्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत त्यांसंबंधी सावधगिरीनेच वागणे जरूर असते. व्यर्थ विरुद्ध जाऊन इतराजी का करून घ्या ? अशा विचारांनी आपल्या कल्पनांस फांटा द्यावा लागतो.
 एकत्र असल्याने थोडक्यांत चरितार्थ चालवतां येतो व गरजाही भागतात, ही गोष्ट सत्य आहे. कारण वेगळा