पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[३]

 आतां, सांप्रतची आपल्या समाजाची व्यवस्था पाहिली असतां अविभक्त कुटुंबपद्धतिच आपल्यांत प्रचलीत असलेली दिसून येते. याविषयी स्थूलमानाने विचार केला असतां नफे त्याचप्रमाणे तोटेही आहेत. परंतु नफ्यापेक्षा तोटे अधिक आहेत असेंच म्हटले पाहिजे. अविभक्त कुटुंबामध्ये परस्परांविषयी प्रेमभाव असतो. कुटुंबांतील एकाच व्यक्तीवर सर्व भरिभार असल्यामुळे दुसऱ्या कोणास प्रपंचाची काळजी वहावी लागत नाही. एखादा निरुद्योगी राहिला तरी त्याला उपवासी रहाण्याची पाळी येत नाही. परतंत्रतेची संवय झाल्यामुळे आज्ञाधारकता हा गुण वसतो. एकाच्या सदाचरणाचा कित्ता दुसरा वळवितो. परस्परांस मदत होते. श्रमविभाग होऊन फल मोठे मिळतें, खर्चही काटकसरीने होतो, असे फायदे एकत्र राहिल्याने होतात, नाहीं असें नाही. तथापि अशा स्थितीत कौटुंबिक सौख्य किती मिळत असेल हे ज्याचे त्यासच माहीत ! कारण एकत्र अक्षयीं वास्तव्य झाल्याने बंधुबंधूंमध्ये, पितापुत्रांमध्ये, सास्वासुनांमध्ये, जावाजावांमध्ये, कलह उत्पन्न होण्याचे अनेक प्रसंग येतात व कुटुंबाचा मुख्य पुरुष विशेषतः त्याची पत्नी जर शहाणी नसली तर असले प्रसंग अव्याहत चालतात. वास्तविक घरांत ऐक्य व प्रेमभाव ही दिसावी, परंतु यांच्या अभावीं परस्परांची मनें शुद्ध न रहातां एकमेकांविषयीं विटून जातात. स्त्रियांच्या अन्तर्यामी वसणारा