पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[५]


संसार म्हणजे खर्च तितका जास्त लागतोच, परंतु ही स्थिति कांहीं अनिष्ट नाही. केव्हां केव्हां पुढील प्रजा अर्थार्जन करण्यास निरुपयोगी असल्यामुळे कर्त्या पुरुषांना नातवंडापर्यंत लग्ने मुंजी करण्याचा प्रसंग येतो. पुष्कळ वेळां असें घडते की, बापाच्या अमदानींत जो मुलगा निरुद्योगीपणांत दिवस घालवितो व संपत्तींत लोळत असतो तोच ती स्थिति बदलतांच अत्यंत विपन्नावस्थेस येतो. ही दोन्हीही वाईटच. निर्वाह थोडक्यांत झाला म्हणजे त्यांत मोठा पुरुषार्थ आहे असे नाही. जो जो अधिक श्रम करण्याकडे मनुष्याची प्रवृत्ति होते तो तो राष्ट्राचे पाऊल पुढेच पडते हे विसरता कामा नये.
 समाजाची प्रस्तुत व्यवस्था एकदम बदलून टाकणे हे कोणाच्याही स्वाधीन नाही. अविभक्त स्थितीत तोटे आहेत हे जरी आपणास दिसत असलें तथापि प्राप्त स्थितीत मनाचे समाधान करून घेण्यास अंतर्व्यवस्थेत इष्ट ते फेरफार करणे जरूर आहे व असे फेरफार करण्यास अंतर्व्यवस्थेची सूत्र ज्या स्त्रियांच्या स्वाधीन आहेत त्यांच्या स्थितीत सुधारणा प्रथम झाली पाहिजे. स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा करण्यापूर्वी त्यांच्यावर वैवाहिक अवस्थेचा बोजा जो त्यांच्या संमतीविना लादला जातो त्याबद्दल विचार करणे अत्यावश्यक आहे.
 लग्नाचा उद्देश समाजाचे अस्तित्व अबाधित व चिर