पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भावी आयुष्य सुखमय
करण्याची
तरुण पिढीवर असलेली
जबाबदारी.



अध्यक्षबाई व प्रिय बांधव हो !


 आज आपणांपुढे 'भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी' हा विषय आहे. यासंबंधी अश्रुतपूर्व म्हणजे मी आपणांस काही माहिती देणार आहे असे नाही. आजपर्यंत कित्येक विद्वान् स्त्रीपुरुषांचे व आपल्या पूज्य गुरुवर्यांचे उपदेश आपण आपल्या हृत्पटलावर कोरून ठेविलेले असतील आणि आपले सर्व आयुष्य जर या ठिकाणीच जावयाचे असते तर मग सांगावयाचे विशेष कांही उरलेंही नसते. परंतु वस्तुस्थिति तशी नाही. बहिणीच्या मनास ज्ञानाने प्रगल्भ दशा आलेली नसली तरी तिच्या कळकळीकडे लक्ष पुरवून सहृदय बंधु तिचे म्हणणे ऐकून घेतो त्याप्रमाणे आपली भगिनी म्हणून जें हितगुज मी आपणांस निवेदन करणार