हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना
प्रस्तुत भाषण मी ता. २१ सप्टेंबर १९१२ रोजी पुणे येथील डेक्कन कॉलेजांत 'डिबेटिंग युनियन' तर्फे झालेल्या व्याख्यानमालेत श्री. सौ. काशीबाई कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली केले होते. त्यानंतर प्रथम तें पुणे येथील 'दैनिक ज्ञानप्रकाशां'त सविस्तर प्रसिद्ध झालें.
हे व्याख्यान पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्यास तरुण पिढीला फारच उपयुक्त होईल अशी बऱ्याच सन्मान्य बंधुभगिनींनी सूचना केल्यामुळे तें आतां स्वतंत्र रीतीने प्रसिद्ध करण्यांत येत आहे. यांतील विचारांस अनुसरून तरुण मंडळींनी आपल्यावरची जबाबदारी ओळखण्याचा थोडा जरी प्रयत्न केला तरी माझ्या श्रमाचे सार्थक झालेंसें मला वाटेल.
| पीसकॉटेज-सातारा | ||
| मथुराबाई मोरेश्वर जोशी | ||
| ता. ६ माहे डिसेंबर १९१२. |