पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[४९]


उन्नति साधीन असा मनाचा निर्धार पाहिजे. अशी ज्याची वृत्ति असेल, तोच खरा मनुष्य व त्याचेच जन्मास आल्याचे सार्थक्य होते. सामाजिक सुधारणेस आपल्या हातून मदत व्हावी अशी इच्छा असेल त्याने उच्चनीच भावाचा त्याग केला पाहिजे. मनुष्यप्राणी येथून तेथून सारखा. कमी जास्त कोणी नाही. त्याच्याविषयी समान भाव जागृत पाहिजे. दासांनी म्हटलेलेच आहे की “जें जें आपणांसी ठावें । तें तें इतरांसि शिकवावें । शहाणे करूनि सोडावे । सकळ जन ” या नरदेहाची इतिकर्तव्यता म्हणजे देह त्यागितां कीर्ति मागे उरावी' अशी आहे. आपल्या चिरवियोगामुळे जितक्या जास्त लोकांना वाईट वाटेल तितकी आपली लोकप्रियता जास्त ! आपल्यामुळे आपल्या बंधूभगिनींची उन्नति साधावयाची हेच आपले ध्येय ठेवून आपल्या उपयुक्ततेचा परिघ वाढविला पाहिजे. आजकाल आमच्या समाजांतील व्यंगेंच नुसती नष्ट करावयाची म्हटली तरी किती स्वार्थत्यागी तरुणांची जरूर आहे ! 'सर्व्हट्स ऑफ इंडिया सोसायटी, 'सेवासदन,' 'अनाथ बालिकाश्रम, ' 'महिलाविद्यालय ' आदिकरून संस्था किती उपयुक्त काम करीत आहेत, हे आपणांस माहीतच आहे.
 आतां राजकीय कर्तव्य पाहूं:-आपण प्रजाजन या नात्याने सार्वभौम सरकारशीं अत्यंत राजनिष्ठ असलें