पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[४७]


उपाय नाही. परंतु दोघे सज्जन असतील तर त्यांचा प्रणय संबंध आजन्म टिकलाच पाहिजे. शेक्सपियरने म्हटले आहे:-
 " सुपरीक्षित जो असे मित्र त्या, घट्ट प्रेमरशनांहीं ॥
 आंवळूनियां हृदयीं ठेवी रत्न तयासम नाहीं ॥ १॥"
 बाकी अस्सल स्नेही जगांत विरळाच. त्यांची वाणी व करणी अंतःकरणपूर्वक असावयाची. त्यांना पराकाष्ठेची कळकळ व जीवाला जीव द्यावयाला तयार असे ते असतात, ते स्वतः आपल्यापासून गौप्य ठेवावयाचे नाहीत व आपणही त्यांच्यापासून ठेवू नये; परंतु दृढ मैत्री ठेवावी. असले मित्र अक्षयी जवळ करावे व त्यांना सदैव साह्य करावें. स्नेह्यास्नेह्यांचें जें प्रेमपरिपूर्ण संभाषण चालतें तें " म्लानस्य जीवकुसुमस्य विकासनानि " या योग्यतेचे असते. तथापि मित्रामित्रांनी कधी वादाच्या भरीस पडावयाचे नाही, हे लक्षात ठेविले पाहिजे. नाहीतर त्यामुळे प्रेमभंग होऊन स्नेहांत व्यत्यय यावयाचा. सख्ख्याला नेहमी समानशीलत्वाची जरूर असते-जसे तेलपाणी एकत्र केले तर भिन्न भिन्न दिसते; व दूधपाणी मिसळल्यास अक्षयी एकजीव होऊन रहाते. कोणालाही एकांतवास व मित्रविरहित आयुष्य आवडत नाही. आपल्या प्रेमाला विभागी कोणी तरी लागतोच-परंतु गीतेत सांगितल्याप्रमाणे अनुद्वेगकर, सत्य, प्रिय आणि हितकर असेच शब्द बोलण्याचा प्रत्येकाचा निश्चय