पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[४४]


तच आहे. भावि पिढीच्या शिक्षणाची जबाबदारी आपणांवरच आहे. हे कॉलेज म्हणजे आपली पवित्र अशी माता आहे. या उपमेइतकी दुसरी कोणतीच सुंदर उपमा शिक्षणसंस्थेला नाही. आईचे मुलांविषयींचे प्रेम निरपेक्ष असते म्हणून मुलांवर तिचे ऋण जास्त आणि तें फेडण्याची जबाबदारीही मुलांच्यावर त्याच मानाने वाढते. कॉलेज व विद्यार्थी यांची गोष्ट तशीच आहे. दोन्ही ठिकाणी जगाचा अनुभव पाहिला तर सारखाच. स्वार्थत्यागी व पुत्रवत्सल अशा माताच जास्त आढळतात, तितकी मातृभक्त मुलें सांपडत नाहीत. कॉलेज आणि शिष्य-वर्ग यांनाही तोच नियम लावला म्हणजे शिक्षण वाढेल तसतशी मातृभक्तांच्या संख्येतही भरच पडली पाहिजे. मातृस्वरूपी कॉलेजांतील आपण मुलें म्हणजे खरोखर बंधूंप्रमाणे आहांत, म्हणून आपणांत निर्मल बंधुप्रेम असून या संस्थेचा पहिल्या प्रतीचा अभिमान आपण बाळगिला पाहिजे. एकी होण्यास प्रेमबंधन अगदी दृढ पाहिजे. दुराग्रहास पेटून दुफळी होऊ देऊ नये. एवढ्या मर्यादित मंडळींत जर प्रेम राहिले नाही तर राष्ट्रीय उन्नति आपल्या हातून कशी साधली जाईल ? परक्यांशी प्रसंग येईल तेथे एकजुटीने आपण आपल्याठायीं वसत असलेल्या अभिमानाचे पाणी दाखविण्यास तयार असलें पाहिजे. अलीकडे कित्येक तरुणांची प्रवृत्ति सर्वस्वी