पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[४२]


आपले नांव लक्ष्मी असे सांगून 'ज्या ठिकाणी शील, धर्म, सत्य, सद्वृत्त, व बल हे असतात त्याच ठिकाणी मी स्थिरत्वानें असतें' असें म्हणून ती गेली. यावरून शीलाची योग्यता आपल्या ध्यानी येईल.
 मुख्यतः नीति, सदाचार व दानत ही चांगली राखली पाहिजेत. मन बिघडण्यास नाटकासारखें कारण सुद्धा पुरेसे होते व त्यापासूनच पुढे व्यसनाकडे प्रवृत्ति होते. टिटॅनिक आगबोटीच्या अपघातात मृत्यु पावलेले 'रिव्ह्यू ऑफ रिव्ह्यूजचे, सुप्रसिद्ध संपादक मि. वुइल्यम टॉमस स्टेड यांनी ५३ वर्षांपर्यंत नाटक पाहिले नव्हते, असे म्हणतात. नाटके सर्वच वाईट असें माझें म्हणणे नाही. परंतु सन्मार्गाला नेणारी व उदात्त विचार ज्यांत प्रधान आहेत अशी थोडींच. बहुतेक शृंगाररसपूर्णच जास्त. म्हणून विद्यार्थिदशेत किंवा त्यापुढील आयुष्यांत सुद्धा मनाची चलबिचल होईल अशा प्रकारची नाटके न पाहण्याचा क्रम ठेवावा. वास्तविक आपलें आचरण कसें निर्दोष असावें ! विद्वत्तेची कल्पना म्हणजे काय तर समुद्रासारखी गंभीर वृत्ति व्हावी. इतरांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ असें मानण्याकडे व वर्चस्व संपादण्याकडे कल नसावा. थोर पुरुषांची उदाहरणे नित्य दृष्टीसमोर ठेवावी. कित्येकजण म्हणतात की, ग्रॅज्युएटामध्ये व्यावहारिक ज्ञानाचा अभाव दिसून येतो. असल्या आक्षेपास आपण