पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[४१]


वर प्रल्हाद प्रसन्न झाला व ब्राह्मणरूपी इंद्रास म्हणालाः 'तुला जे पाहिजे असेल तें सांग. मला फार संतोष झाला आहे. मी तुझी इच्छा पुरवीन.' इंद्र ह्मणालाः 'महाराज, त्रैलोक्याधीश हे पद आपण कसे मिळविलें ?' तेव्हां तो म्हणालाः ‘ह शुक्राचार्य गुरुमहाराजांच्या कृपेचे फळ आहे. मी नीतिमार्गाचे अतिक्रमण केले नाही. ब्राह्मणांना कधी पीडा दिली नाही. आतां तुला कसली इच्छा आहे ? ' इंद्र म्हणालाः ‘दुसरी काही नाही, आपणापाशी असलेल उत्तम शील तेवढे मला द्या म्हणजे झालें.' प्रल्हादाने 'बरें आहे' असे म्हणताच इंद्र नमस्कार करून निघून गेला. थोड्याच वेळांत प्रल्हादाचे शरीरांतून एक तेजस्वी पुरुष बाहेर पडला. त्याला 'तूं कोण ? ' असें विचारतांच तो म्हणालाः 'माझें नांव शील आहे. तूं माझा त्याग केलास म्हणून मी ब्राह्मणाकडे जातो.' तो अंतर्धान पावल्यावर तसाच दुसरा निघाला. त्याला तसेंच विचारतां तो म्हणालाः 'मी धर्म आहे. जेथे शील रहातें, तेथेंच माझी वस्ती.' त्याचे मागून तिसरा पुरुष निघाला. तो म्हणालाः 'मी सत्य आहे. शील व धर्म जेथ गेले तेथेंच मी जातो.' नंतर चवथा निघाला. त्याचे नांव सद्वृत्त. तोही गुप्त झाला. इतक्यांत मोठा शब्द झाल व पांचवा पुरुष बाहेर आला. त्याचे नांव बल होते. तो

गेल्यावर महातेजस्वी अशी सुंदर स्त्री बाहेर आली. तिने