पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[४०]


होण्याचा प्रसंग येणार नाही. देशाची भावी सुसंपन्नावस्था आपणांवर अवलंबून आहे. राष्ट्रीय पुरुष आपणच आहां. किती तरी महत्वाचा व जबाबदारीचा कर्तव्यभार आपणांस आपल्या शिरावर घ्यावयाचा आहे.
 नैतिक बाबीसंबंधी विचार करावयाचा म्हणजे त्यांत शीलसंपन्नतेचा मुख्यत्वेकरून अंतर्भाव होतो. कुल हे यट्टच्छेने मिळतें. ते मिळविणे आपल्या स्वाधीन नाही, परंतु शील हे ज्याचे त्यास प्रयत्नानें प्राप्त करून घ्यावयाचें असते. त्यावर मनुष्याची योग्यता व सर्व आयुष्याची इतिकर्तव्यता, यशापयश हे अवलंबून असते म्हणून आपण शीलवान् व्हा. दुसऱ्याचे वैभव किंवा सौख्य पाहून अंतःकरणास यत्किंचितही विषाद वाटूं देऊ नका. शीलाविषयी पुराणांतरीं प्रसिद्ध असलेली एक गोष्ट आहे. तिचे तात्पर्य ध्यानांत ठेवण्यासारखे असल्यामुळे ती गोष्टच मी आपणास सांगतें.
  प्रल्हादानें इंद्रापासून त्रैलोक्याचे राज्य हरण करून आणल्यावर ते परत कसे मिळेल, अशी इंद्रास चिंता पडून तो बृहस्पतीकडे गेला. तेव्हां त्याने सल्ला दिली की, 'प्रल्हाद आहे शीलसंपन्न. तेवढी त्याची शीलसंपन्नता जर तूं प्राप्त करून घेशील तर ऐश्वर्य पुनः मिळेल.' गुरूचे हे शब्द ऐकतांच इंद्र ब्राह्मणवेषाने जाऊन प्रल्हादाचे सेवेस राहिला. अशा प्रकारे बरीच वर्षे सेवा झाल्या-