पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[३९]


शिखरावर चढला तरी त्यांना आपल्या हृदयांत स्थान असूंद्या. 'विद्या विनयेन शोभते, ' हे सदैव ध्यानांत धरा. शक्य तितकें त्यांच्याविरुद्ध जाण्याचा प्रयत्न करू नका. परंतु जर तुमच्या आयुष्याला भिन्न दिशा लावण्यासारखी एखादी गोष्ट असली किंवा सर्व जन्माचे नुकसान होण्यासारखे असले, तर गोड शब्दांनी त्यांचा गैरसमज दूर करा. मुलींच्या इतकें मुलांना आईबापांविषयी प्रेम नसतें असें जगांत म्हणतात, परंतु या आक्षेपास जागा देऊ नका. ज्यांनी आपल्या साहाय्याची अपेक्षा करून स्वतःच्या आयुष्याचे दिवस काढले, सर्वतोपरी स्वार्थत्याग केला, स्वसुखनिरभिलाष राहिले त्यांना मदत करणे हे आपलें आद्यकर्तव्य आहे. वडिलांना न आवडणारी व तुमच्या गैरहिताची गोष्ट असेल, तर त्या मोहापासून किंवा व्यसनापासून तुमची तत्क्षणी परावृत्त होण्याची तयारी पाहिजे. स्वतःच्या वर्तनामुळे त्यांना दु:ख होईल असें करूं नका. पुष्कळ वेळां माझ्या असे पाहण्यांत येते की, वडिलांची प्रागतिक किंवा उदार मते सुद्धा तरुणांस पसंत नसतात व ती न आचरिल्याने ते आपलें हंसें करून घेतात. वास्तविक असें कां असावें ? प्रायः मुलें पित्याचे अनुकरण करतात असा नियम आहे. वडिलांच्या कीर्तीत तुमच्या हातून भर पडेल अशीच वागणूक असावी. आपले प्राप्तव्य अतिशय उच्च प्रकारचे असूद्या ह्मणजे निराशायुक्त