पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[३८]


परमेश्वर, या न्यायाने त्या नाखुष असणे शक्यच नाही. परंतु मुलांची स्थिति तशी नसते. त्यांना वाटेल तें करण्याची मोकळीक ठेविलेली आहे, प्रथमपत्नी गत झाल्यावर तिच्या चवदाव्या दिवशी जरी त्यांनी पुनः मुंडावळ बांधली तरी समाजाची परवानगी आहे. त्याच अल्पवयस्क मुली दुर्दैवाने पतिसुखास मुकल्या की त्यांचे जीवित व्यर्थच जाते. अशा समयीं वडील माणसांचे मन वळवून सर्वतोपरी प्रेमभावाने वर्तन करून आपल्या घरांतील भगिनी किंवा भावजया ज्या अशा अनाथ झाल्या असतील त्यांची स्थिति शक्य तितकी संतोषास्पद करणे हे सुद्धा तरुण पिढीचेंच कर्तव्य आहे. यांत सुद्धा सुशील पत्नीची मदत चांगली होते. सारांश, पतिपत्नी समानशील असून उभयतांचें अंतःकरण एक असलें ह्मणजे सर्वतोपरी पुरुषांना गृह हें सौख्यकारी होणारच व त्याचा इष्ट असा परिणाम भावी आयुष्यावर झालाच पाहिजे.
 आपण सध्या तरुण आहां. नवें रक्त आपल्या शरीरांतून खेळत आहे तोपर्यंत वृद्धावस्थेच्या कल्पना आपल्या मनांत येणे शक्य नाही. परंतु ज्या तुमच्या मातापितरांनी केवळ भावी सुखाकडे लक्ष देऊन तुमचे पालनपोषण केलें, हरतऱ्हेचे कष्ट सोसले, विद्यादान दिले, त्यांना आपण आजन्म विसरू नका. त्यांना योग्य सन्मान द्या. आपण जरी सौख्याच्या, वैभवाच्या व अधिकाराच्या