पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[३७]


या शब्दाची व्याख्या देतांना पतिपत्नींच्या एकरूपतेचें मोठे मार्मिक वर्णन केले आहे. तो म्हणतो:-
 "अंतःकरणतत्त्वस्य दंपत्योः स्नेहसंश्रयात्
 आनंदग्रंथिरकोऽयमपत्यमिति बध्यते ॥"
  याचा अर्थ स्पष्टच आहे की, “ मातापितरांच्या अंतःकरणांच्या तत्त्वांची आणि स्नेहसंश्रयाच्यायोगानें बांधलेली अशी जी आनंदमय गांठ तिला अपत्य म्हणावें." ही अंतःकरणांची तत्त्वे जर पूर्णपणे जुळलेली नसली तर खरोखर त्यासारखें दुःख नाही. अंतःसमता नसेल तर विवाह हा पोरखेळासारखा प्रकार होईल. अशा दंपत्यांना लोक कदाचित् सुखी म्हणतील, परंतु ख-या सौख्याची प्राप्ति त्या उभयतांनाही व्हावयाची नाही. कारण त्यांचे आत्मे संलग्न झालेले नसावयाचे. आपल्यामध्ये असे विजोड विवाह कितीतरी होतात की त्यामुळे पतीला लग्नापासूनच आपल्या पत्नीचा तिटकारा येतो. त्यामुळे ते लग्न कांहीं दोघांनाही सुखावह होत नाही. 'मनोरंजना'च्या दरबारअंकांतील 'संपादिका ' ही गोष्ट अशाच प्रकारची आहे. त्यांतील नायक रघुनाथराव यांना आपली पत्नी जानकीबाई हिचा विलक्षण तिटकारा उत्पन्न झाला होता. आतां पुढें ती विद्वान् निपजून पतिप्रेमास पात्र झाली, हा भाग निराळा. तसें भाग्य सर्वांचेच नसतें. पत्नीला प्रायः पति पसंत पडला नाहीं तरी आमच्या हिंदु स्त्रियांचें जें ब्रीद की पति म्हणजे