पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[३६]


est incitement and whose approbation was my chief reward, I dedicate this volume. " ह्मणजे “ जिच्यामुळे उत्तम लेख लिहिण्याची स्फूर्ति मजमध्ये उत्पन्न झालीं, त्यांतील कांहीं कांहीं उत्तम भाग जिच्या स्वतःच्या कृतीचें फळ होय, जिच्या उच्च सत्यनिष्ठेनें व न्यायप्रियतेने असे लेख लिहिण्यास नेहमी मला उत्तेजन मिळालें, व जिची मान्यता हेच माझें उत्तम बक्षीस असे, अशा माझ्या प्रिय सखीस-पत्नीस हा ग्रंथ 'मी अर्पण करितों.
 पतीने आपल्या पत्नीची मते स्वतःप्रमाणे बनविणे हे अत्यंत अवश्य आहे, नाही तर विचारभिन्नतेमुळे कलह होण्याचा संभव असतो, व पुरुषांना आपली सुधारलेली मतें झुगारून देऊन नीतिधैर्य नाहीं असें जनसमूहाकडून म्हणवून घ्यावे लागते. त्याशिवाय 'प्रेमनिराशा' नाटकांतील नानासाहेब व इंदिरा या दंपत्याप्रमाणे कुटुंबसौख्याचा नाश होतो तो वेगळाच. संसार सुखमय होण्यास पतीपत्नींमध्ये स्वभावसादृश्य असणे ही गोष्ट अत्यंत जरूर आहे. 'एकेस्थानी उभय परि ते भिन्न सारे विचार ' असें उपयोगी नाही. बाह्यात्कारी लोकांना तादात्म्य झालेंसें वाटले तरी अंतर्याम एक असेल तर उपयोग ! पतिपत्नी, हृदयैक्य होऊन विवाहसंबंध जुळणे ही मोठी अजब चीज आहे. भवभूतीने आपल्या उत्तररामचरित्रांत 'अपत्य'