पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[३५]


वधूच्या संपत्तीकडे अगर रूपाकडे पाहून तिची निवड करूं नये. कुलशीलाकडे पाहून करावी. लग्नापासून खरें सौख्य व्हावे अशी इच्छा असेल तर सद्गुणी आणि ज्ञानसंपन्न स्त्रीच पसंत करा. पत्नी अगदी स्तब्धही उपयोगी नाही, किंवा वाचाळही नसावी, तशीच ती सुशिक्षित असली पाहिजे. निदान आकलनशक्ति तरी तिच्यांत असावी. अशी स्त्री संसारांत कसाही प्रसंग आला तरी धिमेपणाने वागेल. संपत्तींत तिला गर्व होणार नाही. विपत्तीत तिच्या ठायीं धैर्य राहील. तिच्या सुशीलतेमुळे मुलेही सुशील निपजतील. प्रेमळ पत्नी घरी असल्यावर, बाहेर कितीही आनंददायी मित्रमंडळ असले तरी घरी केव्हां जाऊं असें सहजच वाटेल. "
 पतीच्या कार्याबद्दल कळकळ आणखी सहानुभूति ठेवून त्यास मदत करणे हे गृहिणींचे काम आहे. जॉन स्टुअर्ट मिल्ल यांची पत्नी ह्मणजे एक रत्न होते. 'स्वातंत्र्य ' या विषयावर मिल्लसाहेबांनी एक उत्कृष्ट निबंध लिहिला आहे. त्याच्या आरंभी त्यांनी जे तिच्याविषयी ह्मटले आहे ते हृदयंगम आहे. ते असें:-
 "To her memory who was the inspirer and in part the author of all that is best in my writings—the friend and wife whose exalted sense of truth and right was my strong-