पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[३४]


कलहार्थ परिश्रम करण्यास पुनः नवीन हुरूप कसा प्राप्त होईल हे अनुभवाविना कळावयाचें नाही. पतिपत्नींचें धोरण, उमेद चिंता, सर्व एक पाहिजेत. मनुष्याचे सुखदुःख केवळ पत्नीवर अवलंबून आहे. त्याची सज्जनता सुद्धा त्याच्या गृहस्थितीवर अवलंबून आहे. प्रपंचांत खरें सुख जर आपणांस पाहिजे असेल तर पतिपत्नींत नेहमी तडजोड करण्याचीही बुद्धि पाहिजे. सदोष दृष्टि न ठेवतां आपल्याशी इतरांनी प्रेमाने वागावे अशी इच्छा प्रत्येकास असते ह्मणून आपणही तसेंच वागले पाहिजे. सुस्वभावी माणसें सर्वांना आपलेसें करून घेतात. पतिपत्नींचा वर्तनक्रम एका आधुनिक कवीच्या ह्मणण्याप्रमाणे असावा. तो असाः-


 संसार हा भौतिक प्रेमगाडा ।
 ईर्षा सुखाशा द्वयचक्र जोडा ॥
 माखोनियां शिक्षण ओंगणानें ।
 त्या ओढिती दंपति भूषणानें ॥ १ ॥
  सन्मागिं जातां रथ नीट जातो।
 दुर्मागिं जातां अपघात होतो ॥
 कर्तव्यतेच्या करि कासरातें ।
 घ्यावें, सुधे नेइलआपणांतें ॥ २ ॥


 लग्नासंबधी एका थोर गृहस्थाचे म्हणणे आपण लक्षांत ठेवण्यासारखे आहे, ते असें:-" विवाह करते समयीं