पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[३३]


पत्नीशी पतीचा किंवा पतीशीं पत्नीचा निकटसंबंध जडलेला असतो, त्यांच्या अन्योन्यसहवासामुळे परस्पर स्वभावावर किती परिणाम होत असेल तो पहा. ह्मणून दोघांहीमध्ये विचारौदार्य, पवित्र वर्तन, मनमिळाऊपणा, आदिकरून सगळे गुण पाहिजेत, नाहीतर एकाच्यामुळे दुसऱ्याच्या सद्गुणांचा विकास होण्याऐवजी उलटा ऱ्हास मात्र व्हावयाचा.
 पतिपत्नींचे गुण व अभिरुचि अगदी समसमान असणे हेही अवश्य आह. कारण तसे नसेल तर सौख्याचा भाग कमी अनुभवास येईल. पतीचे हृद्त पत्नीला कळलें पाहिजे, तशी तिच्यांत शक्ति नसेल तर खरी प्रेमोत्पत्ति कशी होणार ? प्रेमदृष्टीस सर्वच रमणीय भासतें ही गोष्ट जरी खरी आहे, तथापि अक्षम्य दोष असतील तर ते ह्मणजे प्रेमामुळे झांकले जातात असें कांहीं नाहीं. मुख्यतः स्त्रियांना आपल्या पतीला हरएक कामांत मदत करतां येईल इतकी त्यांची योग्यता पाहिजे. पतिपत्नीचे संवाद उपयुक्त व उन्नतिकारक विषयांवर झाले पाहिजेत. वास्तविक सौख्य होण्यास घरांत आपणांस विश्रांति व चित्तास शांति मिळाली पाहिजे. घरी समाधान होईल अशी आपली खात्री असली तर किती तरी औत्सुक्याने आपल्या आरामस्थानाकडे आपण जाल व त्यामुळे मानसिक श्रम किती लवकर दूर होतील व जीवन-