पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[३२]


खरोखर मुलीला किंवा १५।१६ वर्षांच्या मुलाला तरी काय समजते ? मग त्यांचा तो विवाह खरा तरी कसा ? कारण व्यवहारांतसुद्धा एखाद्याला वचन देतेसमयीं आपण काय देतों याचा अर्थ जर आम्हांस कळला नाहीं तर सहजच आह्मी बेफिकीर राहूं. मग अग्निद्विजांसन्मुख घेतलेली ती शपथ कशाप्रकारे पाळली पाहिजे ? याचा विचार आपणच करा नुकताच कोणाजवळ बोलण्याचा प्रसंग आला असतांना त्यांनी असे उत्तर दिले की " माझी दोन लग्ने झाली तथापि मला अजून विवाहमंत्रांचा अर्थ कळला नाही."
 पतिपत्नींमध्ये जिवलग मित्रांपेक्षाही शतपट अधिक अशी मैत्री असली पाहिजे. ह्मणून दोघांच्या बुद्धीच्या विकासांत, अंतःकरणाच्या वृत्तींत अगदी समानता पाहिजे.( एक दुसऱ्यापेक्षा सर्वतोपरी श्रेष्ठ व दुसऱ्याची योग्यता अगदी कमी असें उपयोगी नाही.) तसे असले तर योग्य कामी सल्लामसलत देतां येणार ना! पत्नीला ज्याप्रमाणे पतीबद्दल अत्यंत आदर वाटतो व तो देवासारखा वंदनीय वाटतो, तद्वतच पतीला पत्नीविषयीही देवतेप्रमाणे पूज्यबुद्धि वाटली पाहिजे.
 कोणाही मनुष्यप्राण्याचा स्वभाव असा असतो की, तो मूळचा कसाही असो, इतरांच्या वागण्याचा परिणाम त्याच्यावर थोड्याबहुत प्रमाणाने होतोच. मग ज्या