पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२९]


त्याचवेळी त्यांनी विजोड विवाह होऊ नयेत अशी खबरदारी घेतली पाहिजे.
 पत्नीबद्दल पोपनें म्हटले आहे की:-
"All other goods by fortune's hand are given A wife is the Peculiar gift of heaven.”
  पत्नीचे अंतःकरण ह्मणजे विविध प्रकारच्या काळज्यांनी त्रस्त झालेल्या पतीच्या चित्ताचे विश्रांतिस्थानच आहे. पत्नीविना मनुष्याचा संसार होत नाही. कित्येक वेळां मित्रसुद्धां पारखा होतो, परंतु सुशील गृहिणी पतीचा त्याग करण्यास कधींच प्रवृत्त होत नाही. पतिपत्नींचे हृदयैक्य मात्र उत्कृष्ट प्रकारचे पाहिजे. ह्मणजे कितीही विपत्ति येवो, मनुष्य डगमगणे शक्य नाही. अशा प्रसंगी पतिपत्नी एकरूप होऊन परस्परांवर असलेल्या बहुमूल्य विश्वासामुळे परस्परसहायकारी होतात व पत्नी आपल्या पतीस मार्गदर्शिकेप्रमाणे उपयोग पडते; “संपत्तीच्या काळांत ज्या पत्नीचा उपयोग मित्राप्रमाणे होतो ती विपत्तीमध्ये शांत व रम्य अशा एकांत स्थलाप्रमाणे उपयोगी पडते” असे एका विद्वानाने म्हटलें आहे. दैवंदुर्विलासाच्या काळांत स्त्रिया कित्येक वेळां आपलें अद्वितीय धैर्य प्रकट करतात. एक कवि ह्मणतो, "रत्नाकरांतील रत्नभांडार हे स्त्रीप्रीत्यंतरगत मानवसौख्यापेक्षा कमी मूल्यवान् आहे."