पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२८]


एकवार Dr. John, Cowan, M. D. यांच ' The Science of a New Life' हे पुस्तक अवश्य वाचावे, अशी माझी शिफारस आहे. त्यावरून भावि आयुष्य सुखमय करण्याची गुरुकिल्लीच आपल्या हाती सांपडल्यासारखें होईल.
 प्रौढविवाहाने संतति उत्तम निपजेल हे तर उघडच आहे, परंतु सासुरवास या शब्दाचा जो 'जाच' असा विपरीत अर्थ झाला आहे त्यासही आळा बसेल. मन सुसंस्कृत झाल्यामुळे दागिने व संतति यांची जी अमर्याद हांव स्त्रीवर्गात दिसून येते व अज्ञानामुळे नवससायास करण्याकडे प्रवृत्ति होते ती नष्ट होईल. लहान बालिकांना सासर म्हटले ह्मणजे किती भयंकर वाटतें ! की त्यांना अल्लड वृत्तीचा त्याग करून गंभीर व्हावे लागते. यदृच्छाहार ठेवावा लागतो. हौस नष्ट करून मिळेल त्यांत संतोष मानला पाहिजे. नाजुकता विसरून सहनशीलता अंगीं आणावी लागते. त्यांनी मोकळ्या मनाने हंसावयाचे बोलावयाचें नाहीं, दुखल्या-खुपल्यास कुरकुरावयाचें नाहीं व केव्हाही जडभारी काम आले तरी नाही ह्मणावयाची सोय नाही.
 अलीकडे कित्येक मुलें B. A., M. A. ची डिग्री घेतल्याविना विवाहच करावयाचा नाही असा निश्चय करतात ही गोष्ट फारच उत्तम व अभिनंदनास्पद आहे, परंतु