पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२७]


जाऊं नये ह्मणून केवळ ती सोय आहे. विवाहसंस्कार हवा तेव्हां मग करावा, यापासून फायदेसुद्धा बरेच आहेत. मुलांमुलींचे गुणावगुण बराच काळपर्यंत अनुभविण्यास संधि सांपडते. अशा रीतीने चालरीत समजून मनाला नच पटले, किंवा कांहीं बरा वाईट प्रसंग आला तर मुलांमुलींच्या जन्माचे नुकसान न होऊ देतां योग्य रीतीने वाडगमनिश्चय रद्द ठरवून मुलांमुलींनी अन्य स्थळे पसंत करावी. त्यांतून ज्या मुलींना आजन्म अविवाहित रहाण्याची इच्छा असेल त्यांच्याविरुद्ध ब्रही न काढणे व त्यांच्याविषयी आदरभाव जागृत करणे हेही तरुणांचें कर्तव्य आहे. मत्स्यपुराणांत म्हटलेलें आहे की:-
  “शास्त्रेषूक्तमसंदिग्धं बहुवारं महाफलम् ।
 दशपुत्र समाकन्या या न स्याच्छीलवर्जिता ॥"
  ह्मणजे “ अनेक शास्त्रांत निश्चयाने बहुवार महाफलदायक अशी एक गोष्ट सांगितली आहे. ती ही की, जी उत्तम शीलसंपन्न कन्या आहे ती योग्यतेने दहा पुत्रांसमान आहे." या श्लोकांत कन्येला किती मोठेपणा दिला आहे ? दुसरेसुद्धां संस्कृत ग्रंथांतरी असे आधार सांपडतात; त्यावरून असे सिद्ध होते की, पुत्रांऐवजी कन्या अविवाहित राहू शकतात व त्यांना सर्व कर्मे करण्याचा, तर्पण करण्याचासुद्धा अधिकार आहे. असो.
 जे विवाहेच्छु तरुण किंवा स्त्रिया असतील त्यांनी