पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२६]


एकदेशी असावे असे मला सुद्धा वाटत नाहीं; ते सर्वांगपरिपूर्ण, 'accomplished girl' ह्मणविण्यास योग्य, असें प्रत्येक मुलीस पाहिजे, म्हणजे स्वयंपाकशास्त्र, शिवणकाम, विणकाम, शुश्रूषिकेची कर्तव्ये, स्वच्छता ठेवणे, गानवादन, चित्रकला वगैरे सर्व आले पाहिजे. स्त्रियांच्याठायीं निसर्गतः विनयशीलता, पतिहिततत्परता, बालसंगोपनदक्षता, सत्कृत्यप्रियता व व्यवहारचतुरता इत्यादि गुण असतातच,त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. तसे करण्यास त्यांच्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे. बांधवहो ! आपली घरें आदर्शगृहें असावी अशी जर आपली इच्छा असेल तर प्रौढवधू सुशिक्षित अशीच आपण पसंत केली पाहिजे नव्हे तसें करण्याचा आपला निधार पाहिजे. त्याच्या उलटकृति म्हणजे समाजाच्या हिताविरुद्ध आपण पाप करीत आहों अशीं मनाची दृढ भावना पाहिजे. वास्तविक स्त्रियांना २० वर्षांपुढे हा लग्नाला योग्य काळ आहे, परंतु तोशक्य नसेल तर पूर्ण षोडशवर्षा वधू पाहिजेच. लग्नापूर्वी पाहिजे तर वाङ्मनिश्चय करून ठेवावा. हल्लींच्या विवाहविधींतील रीत जर पाहिली तर अशी आहे की, लग्नासाठी नवरा मुलगा आणावयाला रुखवत जाते आणि तेवढ्या वेळात इकडे वाङ्मनिश्चय उरकून घेतला जातो! वाङ्मनिश्चयानतर विवाह इतक्या अल्प काळांत झालाच पाहिजे अशी वास्तविक शास्त्राची सुद्धा आज्ञा नाही. आपल्यास इष्ट असलेले स्थळ हातचें