पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२५]


 

"सुशिक्षण स्त्रियांसि द्या, सदयता मनीं स्वीकरा ।
 उदार मन ठेउनी, सतत त्या जनी आदरा ॥
 मिळेल बल तें तुह्मां, खचित राष्ट्रवाढीस हो ।
  प्रधान गणतां कसें, प्रगतिशून्य रूढीस हो ॥ १॥
 अनिष्ट स्थिति पाहुनी, उचित मार्ग सेवावया ।
  प्रयत्न करितां भला, जरि सुधारणा व्हावया ॥
 फसे नवल काय हो, गृहिं न गंध या क्रांतिचा।
  इमारत टिकेल का जरि न शुद्ध पाया तिचा ॥ २ ॥
 समाजबलवर्धना, खचित लागतीं सुगृहे।
 ह्मणोनि गृहिणींस द्या, रुचिर शिक्षणा आग्रहें ॥
 स्त्रिया भगिनि जोवरी, तिमिरसागरी वाहती।
 तयां न वर ओढितां, कशि घडे समाजोन्नती'॥ ३ ॥


 स्त्रियांची अवनत स्थिति आज जी आपल्या दृष्टोत्पत्तीस येते, याची कारणे बालविवाह व तदनुषंगिक शिक्षणाचा अभाव हीच होत. ह्मणून प्रौढविवाह प्रचारांत आले पाहिजेत. प्रौढविवाह सार्वत्रिक झाले म्हणजे त्या काळापूर्वी मुलांमुलींना विद्यार्जन करण्यास पुरेसा वेळ सांपडेल. तेवढ्यांत मुलांची व मुलींची शरीरसंपत्ति उत्तम रीतीने वाढेल, व त्याचे इष्ट परिणाम भावि काळांत पहावयास सांपडतील.'महिला विद्यालया'सारख्या पवित्र वातावरणांत सुशिक्षित व सर्वकलासंपन्न झालेल्या वधूचें पाणिग्रहण करण्यास कोणत्या तरुणास अभिमान वाटणार नाही ? शिक्षण नुसतें