पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२३]


'स्त्रिया अज्ञान ' 'त्यांना काय समजते आहे ?' 'त्यांना काय सांगावयाचे आहे' 'त्यांचे ज्ञान चुलीपुरतें' असें पुरुष म्हणतांना दृष्टीस पडतात, परंतु स्त्रियांना जाणून बुजून जर अज्ञानांधःकारांत ठेविल्या तर त्यांचा तरी काय दोष आहे बरें ? आपण त्यांना शिक्षणामृत आग्रहाने पाजलें तर नको म्हणण्याची त्यांची काही प्राज्ञा नाही. पतीची आज्ञा म्हणजे देवाची आज्ञा असा आमच्या हिंदु स्त्रियांचा , भाव आहे. भावि आयुष्य सुखमय करण्यास तरुणांचे आद्य कर्तव्य तेंच आहे. भावि पिढीच्या कल्याणाकरितां तरी स्त्रियांना शिक्षण हे अवश्य आहे. मागें सुधारकांत 'गृहिणी की मोलकरिणी' या मथळ्याचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यांत कदाचित् कोणाला अतिशयोक्ति वाटण्याचा संभव आहे, परंतु तसे नसून त्यांत स्त्रियांच्या स्थितीचे चित्र अगदी उत्तमप्रकारे रेखाटले होते. सर्व दिवसभर प्रपंचाची कामें मोटेला जुंपलेल्या बैलाप्रमाणे करावी, त्यांतून वर मान करण्यासही फुरसत असूं नये व मुलें संभाळणे व चुल्लिकाधर्म हीच जिच्या कर्तव्याची इतिश्री त्या गृहिणीची स्थिति खरोखर शोचनीयच नाही का? स्त्रीपुरुषांना उन्हाची व पर्जन्याची बाधा सारखीच होते पण स्त्रियांना रवितापनिवारणार्थ किंवा पर्जन्याच्या मसळधारांतही छत्रीची अवश्यकता भासत नाही किंवा भासली तरी लोक नांवे ठेवतील मग ती गोष्ट कशाला करा अशी सहजच मनाला शंका