पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२०]

पराक्रमी व तेजःपुंज निपजतील. उत्तम आचार विचार, औदार्य इत्यादि सद्गुण किंवा निर्दयता आदिकरून दुर्गुण भावि पिढीत बहुतकरून तंतोतंत रीतीनें उतरतात. मातापितरें जर आपली जबाबदारी योग्यप्रकारे ओळखतील तर आपलें घर थोड्याच परंतु शक्तिसंपन्न, सौंदर्यपूर्ण, बुद्धिवान, थोर व गुणशाली अशा बालकांनी परिपूरित हे ऊन नंदनवनाचे सौख्य अनुभविण्यास सांपडेल. ज्या समाजांत आपणांस वागावयाचे आहे त्यानेच आपणांवर त्याच्या अवयवांत योग्य अवयव घालण्याची जबाबदारी टाकलेली आहे, परंतु त्यांत जर निःशक्त माणसांची भर पडली तर समाजाचा जोम काय राहाणार ? उलट संपत्तीचा मात्र नाश होणार, कारण असल्या माणसांच्या जोपासनेकरितां समाजाला किती तरी श्रम पडतात. इस्पितळे, वेड्यांची इम्पितळे, अपराधी मुलांस सद्वर्तनास लावणाऱ्या संस्था, दिवाणी व फौजदारी कोर्टे, ही सर्व याचीच निदर्शक आहेत. आज ज्या हजारों स्त्रिया संसार करीत आहेत त्यांत सुद्धा पूर्ण आरोग्यसंपन्न अशी एक तरी स्त्री सांपडेल की नाही कोण जाणे ! ज्यांना पितृत्वाची जबाबदारी शिरावर घ्यावयाची इच्छा आहे अशा मुलांनी प्रथम स्वार्थपरायणतेचा त्याग केला पाहिजे. स्वार्थपरायणता ह्मणजे दुसऱ्याची पर्वा न करता स्वतःवर सकपट प्रेम ठेवण्याची वृत्ति- ह्या वृत्तीची संवय झाली ह्मणजे आपली विवाहित पत्नी हा