पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[१९

तात. परंतु उलटपक्षीं पतीवर तितक्याच महत्वाची जबाबदारी पडते. पति सुशील स्वभावाचा व पत्नी तामसी वृत्तीची किंवा आज्ञाधारक नसली तरी कुटुंबसुखाचा नाश होतोच किंवा उलट स्थिति म्हणजे पत्नी सुशील व गोड स्वभावाची परंतु पतीची वृत्ति करमणुकीच्या चालू कादंबरीमधील 'मायेच्या बाजारांतील अण्णासाहेबाप्रमाणे असली ह्मणजे शेवट पद्माताईसारखाच व्हावयाचा ! आणि अशी उदाहरणे किती तरी असतील ?
 तरुण पिढीला सुख प्राप्त करून घेण्याची महत्वाची जबाबदारी ह्मटली ह्मणजे गृहस्थाश्रमी होण्यापूर्वी त्या आश्रमास योग्य अशी आपली स्वतःची तयारी आहे की नाही हे पाहणे ही होय. कारण राष्ट्राची भावि उन्नति आज आपणांवर अवलंबून आहे. मातापितर हे आपल्या बालकांच्या नुसत्या शरीराचे जन्मदाते नाहीत परंतु त्यांच्याठायीं वसत असलेले मानसिक आणि नैतिक गुणसुद्धा ते त्यांना प्रदान करीत असतात. ही गोष्ट ह्मणजे बुद्धिवैभवशाली मनुष्यप्राण्याला कळत नाही असें थोडेंच आहे ? हा अगदी सामान्य नियम आहे. आईबापांचे विशिष्ट गुण संततीत उतरलेच पाहिजेत. आईबाप निरोगी तर प्रजा निरोगी होणार. ती उभयतां शरीरप्रकृतीने नाजूक तर प्रजा नाजूक, आईबाप जर सुरूप तर प्रजा सुरूप, व जर मातापितरें सुदृढ व सतेज, तर मुलेही