पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



[१८]

घरे पाडणारा परिणाम ह्मटला म्हणजे बालगतभर्तृकांची संख्या तयार होणे हा होय. प्रौढगतभर्तृकांना आपल्या पतिसमवेत घालविलेल्या सुखकर दिवसांचे स्मरण करून तरी दुःखांत किंचित् सुख मानतां येईल, परंतु बालगतभर्तृकांना आपले दिवस कंठणे मोठे कठीण जातें! कारण त्यांचे जीवित कुमारिकांप्रमाणे असल्यामुळे आपणांवर रूढीचा जुलूम कां होतो आहे व तिचें दास्यत्व का पत्करून रहावें हें कांहींच कळत नसल्यामुळे त्यांची स्थिति अनुकंपनीय होऊन जाते! किती तरी स्त्रियांना अशा रीतीने आपलें जीवित दुःसह झालें आहे! असो.
 आतां स्त्रिया वैवाहिक आयुष्यक्रम कंठीत असतांनासुद्धा त्यांच्या स्थितीविषयी जी काही सामाजिक मर्ते आहेत त्यांबद्दल विचार केला की, त्यांना गुलामांप्रमाणे वागविण्याची जी रीत होती त्यांत ह्मणजे विशेष फरक झाला आहे, असे दिसून येणार नाही. कारण उत्तम स्त्री म्हटली ह्मणजे अतिशय नम्रता, पतीच्या अर्ध्या वचनांत सदैव रहाणे, आपल्या भर्त्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींत सौख्य न वाटण्याची बुद्धि, पतिसेवेत सदैव तत्परता, पतीची आज्ञा सदैव शिरसावंद्य मानणे, प्रसंगी पतीकरितां स्वतःच्या प्राणाची पर्वा न करणे, त्याच्या सुखाविषयी अगोदर विचार करून त्याच्याविषयी अनन्य भक्ति व परम प्रीति ठेवणे ही लक्षणे तिची मानली जा